सचिव, तलाठ्यांसह 10 प्रकारच्‍या पदांसाठीच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर, सुमारे 1 हजार जणांची होणार 'सीबीटी-2'साठी निवड

goa gssc cbt 1 exam results declared: ग्रामपंचायत सचिव, तलाठीसह सरकारी खात्‍यांमध्‍ये दहा प्रकारची पदे भरण्‍यासाठी कर्मचारी भरती आयोगाने घेतलेल्‍या सीबीटी-१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात आला आहे.
goa gssc cbt 1 exam results declared
goa gssc cbt 1 exam results declaredDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ग्रामपंचायत सचिव, तलाठीसह सरकारी खात्‍यांमध्‍ये दहा प्रकारची पदे भरण्‍यासाठी कर्मचारी भरती आयोगाने घेतलेल्‍या सीबीटी-१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात आला आहे. या पदांसाठी आयोगाकडे २८ हजारपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. त्‍यातून सुमारे एक हजार जण सीबीटी-२ परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. त्‍यातून ११० जणांची निवड केली जाणार आहे.

आयोगाने ग्रामपंचायत सचिव, तलाठीसह सर्चअर, अवल कारकून, माहिती सहाय्यक, उद्योग निरीक्षक, निरीक्षक, स्टोअर कीपर/गोदाम रक्षक, कोषागार लिपिक (श्रेणी-३), लेखा लिपिक अशा दहा प्रकारच्‍या पदांसाठी २५ व २६ एप्रिल आणि २ व ३ मे रोजी सीबीटी-१ परीक्षा घेतलेली होती.

goa gssc cbt 1 exam results declared
CP Radhakrishnan Goa Visit: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज गोव्‍यात, घटक राज्यदिन सोहळ्‍याला शनिवारी लावणार उपस्‍थिती

या सर्व पदांसाठी २८ हजारपेक्षा अधिक अर्ज दाखल झालेले होते. त्‍यातील काहींनी विविध पदांसाठीही अर्ज केलेले होते. त्‍यातून सुमारे एक हजार जणांची सीबीटी–२ साठी निवड होणार असून, सीबीटी-२ नंतर ११० जणांची नोकऱ्यांसाठी निवड होणार असल्‍याचे आयोगाच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दरम्‍यान, सीबीटी-२ परीक्षेचे वेळापत्रक आयोगाने अजून तयार केलेले नाही. परंतु, लवकरच ती घेण्‍यात येणार असल्‍याचेही सूत्रांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com