Griha Aadhar Scheme: 'गृहआधार'च्या रकमेत वाढ; दिवाळीत CM सावंत करणार मोठी घोषणा

Griha Aadhar Amount Increase: विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहआधारच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचाही त्‍यांनी पुनरुच्‍चार केला.
Griha Aadhar Amount Increase
Griha Aadhar SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्‍हापसा: गोवा सरकारच्या गृहआधार योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात येणार असून, या वाढीची घोषणा दिवाळीदरम्यान केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साळगाव व पर्वरी येथे ते आज बोलत होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहआधारच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचाही त्‍यांनी पुनरुच्‍चार केला. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेतील सध्याच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Griha Aadhar Amount Increase
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

सुधारित रक्कम किती असेल, याबाबतची घोषणा दिवाळीच्या काळात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद २०२९च्या निवडणुकांनंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात लागू होऊ शकते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com