...तर ''50,000 हेक्टर Coastal Land वाचवण्यासाठी जागतिक बँकेकडे धाव घेणार''

केंद्रामार्फत निधीसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवणार
Subhahs Shirodkar
Subhahs ShirodkarDainik Gomantak

गोवा सरकार किनारी भागातील 50,000 हेक्टर जमीन वाचवण्यासाठी प्रयत्नशिल असून ती वाचवण्यासाठी प्रसंगी जागतिक बँकेकडून मदत घेण्याचा प्रयत्न असल्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

(Goa govt to seek funds from center govt and world bank to save 50,000 hectares of land in coastal areas )

Subhahs Shirodkar
Mopa Airport...अन्यथा गोवा महाराष्ट्रात विलिन झाला असता; मोपा नामकरणावरुन 'चर्चिल' यांचे वक्तव्य

पुढे बोलताना शिरोडकर म्हणाले की, आपल्या राज्यामध्ये बुडीत अथवा बिनशेतीची पडीक असणारी समुद्रकिनारी भागात (coastal areas) सुमारे 50,000 हेक्टर जमीन आहे. या जमिनीला वाचवण्यासाठी वेळेत प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यामूळे अशा प्रकारच्या जमिनीला वाचवण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी गोवा सरकार केंद्र सरकारमार्फेत जागतिक बँकेकडे निधी मिळवण्यासाठी प्रकरणार असल्याचं मंत्री शिरोडकर यांनी म्हटले आहे.

Subhahs Shirodkar
Sancoale: प्रलंबित प्रश्नांवरुन सांकवाळ पंचाना ग्रामस्थांनी धरले धारेवर

समुद्रकिनाऱ्यालगत पडीक जमीन होण्याची कारणे विशद करताना शिरोडकर म्हणाले की, हवामान बदलाचा जमीनीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच काही मानवनिर्मित कारणे आहेत. ज्याच्यामूळे ही जमिन नापिक झाली आहे. असे ते म्हणाले.

केंद्रामार्फत निधीसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवणार

जमीनीचा सर्वे करत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे. आणि केंद्रामार्फत निधीसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवला जाईल असे ही ते म्हणाले. तसेच राज्यातील सर्व मतदार संघांचा दौरा करण्याचा आपला मनोदय असून या दौऱ्यात राज्यातील तलाव, सरोवरे, नैसर्गिक पाणवठे यासारख्या जलस्रोतांचे सर्वेक्षण करणार आहे. व त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव काम करण्याचा मनोदय असल्याचा ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com