Sancoale: प्रलंबित प्रश्नांवरुन सांकवाळ पंचाना ग्रामस्थांनी धरले धारेवर

कचरा समस्या,पंचायत इमारत प्रश्नावरुन वातावरण तापले
Sancoale News
Sancoale NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सांकवाळ पंचायतीच्या पहिल्या ग्रामसभेत कचरा व पंचायत इमारतीच्या प्रश्नावर गरमागरम चर्चा झाली. यावेळी सांकवाळ पंचायतीच्या शेडमधील एका भागाला लागलेल्या आगीची पूर्ण चौकशी साठीचा प्रस्ताव पंच तुळशीदास यांनी मांडला. या प्रस्तावाचे उपस्थितांनी ही समर्थन केले. यावेळी अनेक प्रलंबित प्रश्नांवरुन सांकवाळ पंचाना ग्रामस्थांनी धारेवर धरले होते.

(Different issues discused in Sancoale Gram Sabha )

रविवारी सकाळी ( ता. 6) बोलाविण्यात आलेल्या या ग्रामसभेला अपेक्षापेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थित असलेल्यांपैकी काहीजणांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने गरमागरम चर्चा झाली. झुआरीनगर येथील रहिवाशांनी गटारामध्ये टाकलेला कचरा आमच्या शेतामध्ये येतो. शेतामध्ये प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याचा प्रश्न काहीजणांनी उपस्थित केला.

Sancoale News
Goa Crime: थिवीतील 'त्या' महिलेचा खूनच; आरोपी गजाआड

या सभेदरम्यान नागरिकांनी सांकवाळातील बांदेवडे तळ्याची साफसफाई होते का? असा प्रश्न उपस्थित केला. कला भवन प्रेक्षगृहाला माजी सरपंच भगवंत नाईक यांचे नाव देण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. पंचायत इमारत पायाभरणी करण्यात आली. ही इमारत बांधण्यासाठी पुरेशी जमिन मिळाली असतानाही विलंब का लागत आहे. याचा ही जाब ग्रामस्थांनी विचारला.

पंचायतीची दुर्दशा झाल्याने पंचायतीचा कारभार एका भाड्याच्या जागेत हलविण्यात आला आहे. त्यासाठी पंचायत महिन्याकाठी 36 हजार रुपये भाडे देते. मात्र त्या जुन्या पंचायतीत अद्याप टपाल कार्यालय, वीज बील भरणा कार्यालय कोणत्या कारणासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Sancoale News
Vijai Sardesai : ...म्हणून मुख्यमंत्री सावंतांना 'मोपा'च्या उद्घाटनाची घाई; विजय सरदेसाईंचा थेट निशाणा

सांकवाळ पंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी स्वतःचे वाहन का नाही? सोपो का गोळा करण्यात येत नाही ? असे प्रश्न विचारण्यात आले. ग्रामसभेनंतर तुळशीदास नाईक यांनी सांगितले की, कचरा व बिल्डरांमुळे सांकवाळ गावाचे गावपण संपेल याची जाणीव झाल्याने ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकरी आले. ही आनंदाची गोष्ट आहे.

एक नोव्हेंबरला कचरा केंद्राला आग कशी लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.मुरगाव तालुक्यात ज्या कचरा संकलन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले होते. त्यालाच कचरा गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे, याप्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे. त्या शेडमध्ये औद्योगिक कचराही आणला जात असल्याचे दिसून आल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

यावेळी उपसरपंच पिल्ले यांनी सांगितले की, बांदेवडे तळ्याची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यासंबंधी लवकरच पाहणी करण्यात येईल. जुनी पंचायत इमारत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आम्ही पंचायतीचा कारभार भाड्याच्या जागेत हलविला आहे. पंचायतसंबंधी सर्व सोपस्कार झाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये पायाभरणी होईल. यावेळी इतरही काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com