H3N2 Virus : गोवा सरकार H3N2 व्हायरससाठी प्रतिबंधात्मक बैठक घेणार; विश्वजित राणेंची माहिती

सध्या देशभरात सगळीकडे H3N2 विषाणूने सगळ्यांची डोकेदुखी वाढवली आहे.
Vishwajit Rane | H3N2 Virus in Goa
Vishwajit Rane | H3N2 Virus in GoaDainik Gomantak

H3N2 Virus in Goa : सध्या देशभरात सगळीकडे H3N2 विषाणूने सगळ्यांची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राच्या निर्देशानुसार हंगामी इन्फ्लूएंझाचा उपप्रकार H3N2 च्या निरीक्षणावर चर्चा करण्यासाठी गोवा सरकार आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane | H3N2 Virus in Goa
Flights to Goa: आता 'या' प्रसिद्ध शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होणार, तिकीट बुकिंगही सुरू

सावधगिरी वाढवण्याची गरज

तज्ञांनी भारतात दोन H3N2 व्हायरस मृत्यूची नोंद केली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याची खात्री राज्य सरकार करेल.

गोव्यात या वर्षी आतापर्यंत H3N2 व्हायरसची अद्याप नोंद झालेली नाही. 'इन्फ्लुएंझा व्हायरसचा उपप्रकार H3N2 च्या देखरेखीवर चर्चा करण्यासाठी मी मंगळवारी आरोग्य सचिव, आरोग्य विभाग आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीला संबोधित करणार आहे,' असे राणे यांनी काल रात्री ट्विट केले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल आणि आठवड्यातून एकदा आढावा बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले. H3N2 विषाणूबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विविध राज्यांना निर्देश जारी केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com