Flights to Goa: आता 'या' प्रसिद्ध शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होणार, तिकीट बुकिंगही सुरू

राज्यात सध्या पर्यटन हंगाम जोमात असून, दोन्ही विमानतळावर येणाऱ्या प्रवाशी विमानांचा ओघ वाढला आहे.
विमानसेवा
विमानसेवा Dainik Gomantak

गोव्यात दाबोळी आणि मोपा येथील मनोहर विमानतळ कार्यरत आहेत. मोपा येथील विमानतळाचे जानेवारीपासून कामकाज सुरू झाले. राज्यात सध्या पर्यटन हंगाम जोमात असून, दोन्ही विमानतळावर येणाऱ्या प्रवाशी विमानांचा ओघ वाढला आहे.

देशातील अनेक शहरातून गोव्यात थेट विमानसेवा पुरविली जाते, दरम्यान यात अजून एक नवीन शहराची वाढ झाली आहे.

वाराणसी येथून गोवा आणि पुणे या दोन शहरांसाठी थेट विमानसेवेची घोषणा करण्यात आली आहे. वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबतपूर येथून गोवा आणि पुणेच्या पहिल्या थेट उड्डाणासाठी बुकिंग सुरू झाले आहे. पुण्याला जाणाऱ्या सुमारे 60 टक्के आणि गोव्याला जाणाऱ्या 50 टक्के सिट्सचे बुकिंग झाले आहे.

इंडिगो 28 मार्चपासून गोवा आणि 31 मार्चपासून पुण्यासाठी नियमित उड्डाणे सुरू करणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही शहरांसाठी कनेक्टिंग उड्डाणे सुरू असल्याची माहिती विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली. प्रथमच थेट उड्डाण होणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रस्थान आणि आगमनासाठी तिकिटे वेगाने बुक केली जात आहेत.

विमानसेवा
Old Goa: 'समोसावाल्याचा मुलगा धाबा मालकाच्या मुलीशी लग्न करतो तेव्हा', चर्चसमोरील राड्यावरून भडकले नेटकरी

सेवा सुरू होण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक आहेत. दोन्ही विमानांमध्ये 50 ते 60 टक्के जागा बुक झाल्या आहेत. विमानातील बुकिंग पाहता प्रवाशांना ही विमानसेवा पसंत पडत असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांत आणखी बुकिंग अपेक्षित आहे.

पहिल्या दिवशीच्या म्हणजे 28 मार्चसाठी गोव्याच्या फ्लाइटमध्ये 40 ते 50 टक्के बुकिंग झाले आहे. दुसरीकडे, पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये 50 ते 60 टक्के जागा बुक झाल्या आहेत. इंडिगो एअरलाइन्स वाराणसी विमानतळावरून गोवा आणि पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com