Vijai Sardesai In UK: गोव्यातील भाजप सरकारला कान टोचणाऱ्या तियात्राचे वावडे- विजय सरदेसाई

Vijai Sardesai In UK: गोंय, गोंयकार आणि गोयकारपणाच्या रक्षणासाठी आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे, सरदेसाईंचे आवाहन.
Vijai Sardesai In UK
Vijai Sardesai In UKDainik Gomantak

MLA Vijai Sardesai In UK

गोव्याच्या भल्यासाठी तियात्रिस्त प्रसंगी वाट चुकलेल्या राजकारण्यांचे कान टोचतात. मात्र गोव्यातील भाजप सरकारला ही टीका आवडत नाही त्यामुळे हे सरकार तियात्राच्या विरोधात आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई सरदेसाई यांनी केली.

लंडन येथील गोंयकाराना ते संबोधित करत होते. ते म्हणाले,भाजप सरकारला तियात्र आणि तियात्रिस्ट आवडत नाहीत कारण ते राजकारण्यांचा पर्दाफाश करतात. या सरकारने गोव्यात खेळ तियात्रावर कर लावला. एवढे हे सरकार तियात्र विरोधी आहे.

मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की गोंय, गोंयकार आणि गोयकारपणाच्या रक्षणासाठी आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे. गोवा फॉरवर्डला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, गोव्यात एकता वाढवून गोंयकारपणाचे रक्षण करण्यासाठी तुमच्या पैशाची नाही पण पाठिंब्याची गरज आहे आहे, असे ते म्हणाले.

Vijai Sardesai In UK
Delhi Excise Scam: गोवा विधानसभा निवडणूक काळातील आप प्रभारी दुर्गेश पाठक यांची ईडीकडून चौकशी सुरु

गोव्याचा राखणदार ! विजय सरदेसाईंचा ब्रिटनमध्ये गौरव

काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील गोमन्तकीय समुदायाच्या वतीने आमदार विजय सरदेसाई यांचा 'गोव्याचा राखणदार' म्हणून गौरव केला. भावी पिढ्यांसाठी गोंयकारपण आणि गोव्याचे रक्षण करायचे असल्यास प्रत्येकाने 'गोव्याचा राखणदार' व्हायची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते. तसेच, सीमा विरहीत गोवा अशी चळवळ सुरू करण्याची गरज सरदेसाईंनी यावेळी बोलून दाखवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com