Delhi Excise Policy Scam
दिल्ली कथित अबकारी घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
याच प्रकरणी सीएम केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांचीही चौकशी सुरू आहे. दुर्गेश पाठक हे राजिंदर नगरचे आमदार आहेत पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाशी संबंधित आहेत.
दुर्गेश पाठक गोवा विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचे प्रभारी होते. कथित घोटाळ्यातील पैसा आपने गोवा निवडणुकीत वापरल्याचा आरोप, ईडीने केला आहे.
आम आदमी पार्टीला निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप कट रचत असल्याचा आरोप आपने केला आहे. तर, मंत्री आतिशी यांनी ईडी आणि भाजपमध्ये राजकीय युती असल्याचा आरोप केलाय.
भाजप आम आदमी पक्षाच्या नेत्यांना निवडणूक प्रचारापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
अंमलबजावणी संचालनालय (ED) सध्या दिल्ली दारू धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक (PA) बिभव कुमार यांची देखील चौकशी करत आहे. दरम्यान, दुर्गेश पाठक यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात 21 मार्च रोजी एजन्सीने अटक केली होती. कथित घोटाळा प्रकरणात एजन्सी केजरीवालांना 'किंगपिन' मानत आहे.
मंत्री आतिशी यांनी सीएम केजरीवाल यांच्या अटकेनंतर ईडी दुर्गेश पाठकलाही अटक करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली होती. पक्षाच्या चार नेत्यांसह त्यांच्याही अटकेची भीती त्यांनी व्यक्त केली होती.
दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात केवळ मुख्यमंत्रीच नाही तर आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैनही तुरुंगात आहेत.
या प्रकरणात आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.