Goa Trinamool: नगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी 'भाजप' सरकारची धडपड!

Goa Trinamool: नगरपालिका कायद्यातील दुरुस्ती ही भाजपच्या राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.
Samil Volvoikar | Goa Trinamool Congress
Samil Volvoikar | Goa Trinamool CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Trinamool: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा नगरपालिका (दुरुस्ती) अध्यादेशाला मंजुरी दिल्यानंतर ही दुरुस्ती भाजपच्या राजकीय फायद्यासाठी आणण्यात आली असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

अध्यादेश आणून सरकारने लोकशाहीची हत्या केली असून तृणमूल काँग्रेसने यावा तीव्र विरोध केला आहे. भाजप सरकारने पुन्हा अन्यायकारक आणि अलोकशाही मार्गाने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे.

Samil Volvoikar | Goa Trinamool Congress
Goa: पणजी पदपूल अन् रोप वे प्रकल्पांना 'GCZMA'ची मान्यता

राज्यातील नगरपालिकांवर सत्ता राखण्यासाठी सरकारकडून धडपड सुरू आहे. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे, अशी टीका गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त समन्वयक समील वळवईकर यांनी केली.

Samil Volvoikar | Goa Trinamool Congress
Goa Driverless Car: पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच; गोव्यात अवतरली चक्क 'ड्रायव्हरलेस कार'

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त समन्वयक मारियान रॉड्रिग्ज आणि पक्षाचे प्रसार माध्यम संयोजक ट्रोजन डिमेलो उपस्थित होते. हा अध्यादेश गोमंतकीयांचा आवाज दाबण्याचा सरकारकडून होत असलेला प्रयत्न आहे.

भाजपने जनतेची फसवणूक केली असून हा अध्यादेश म्हणजे निवडणूक प्रक्रियेला धमकावण्याची आणि प्रभावित करण्याचे एक कारस्थान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com