अंजुना: पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे राज्य महत्वाचे आहे. मात्र गोव्यात येवून पर्यटकांची हुल्लडबाजी वाढतच आहे. अनेक आतापर्यंत अनेक पर्यटक बीचवर ,स्टंट करताना दिसत होते मात्र आता या पर्यटकांनी हद्दच केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हीडीओनुसार महिंद्रा थारच्या टपावर बसून पायांनी स्टेअरिंग चालवताना पर्यटक दिसले! हा व्हिडिओ अंजुना-अरपोरा रस्ता येथील आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांनकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
(Tourists were seen sitting on the top of Mahindra Thar and steering with their feet in Goa )
समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्याचे प्रकार वाढत आहे.
गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ (Tourist Spot) आहे. त्यामुळे दरवर्षी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. जीवाचा गोवा करून ते निघून जातात. पण काही पर्यटक दारूच्या नशेत मस्ती करतात. त्यांच्या उद्दामपणापुढे स्थानिक ग्रामस्थच नव्हेत तर सरकारी यंत्रणांचीही तारांबळ उडते. काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत समुद्राच्या पाण्यात गाडी नेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुदैवाने अनर्थ टळला होता.
वाहन बेशिस्तीने चालवण्याची जणू पर्यटकांना सवयच
गोव्यात येऊन भाडपट्टीवर किंवा स्वतःचे वाहन बेशिस्तीने चालवण्याची जणू पर्यटकांना सवयच झाली आहे. राज्यात पर्यटकांकडून अपघात होत असून, समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्याचे प्रकारही वाढत आहेत. असाच एक प्रकार अलीकडेच उत्तर गोव्यातील वागातोर (Vagator) समुद्रकिनाऱ्यावर घडला होता. दिल्लीतून आलेले पर्यटक गाडी घेऊन किनाऱ्यावर फिरत होते.
जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या राधानगरी (कोल्हापूर) येथील सागर बापू सर्वटकरने चारचाकी थेट मोरजी किनाऱ्यावर नेली. त्याच्यासोबम महिला लहान मुले होती. पेडणे पोलिसांनी वाहन मालकावर भारतीय दंड सहिता कलम 279, 336 या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.