Goa Governor: गोवा लवकरच बोन्सायची मोठी निर्यात करेल

बोन्साय निर्मितीसाठी गोवा सरकार सकारात्मक
Governor P. S. Sridharan Pillai
Governor P. S. Sridharan PillaiDainik Gomantak

पणजी: गोवा सरकार लवकरच बोन्सायचे सर्वात मोठे निर्यातदार बनवणार असे गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Governor of Goa P. S. Sreedharan Pillai ) यांनी म्हटले आहे. ते राजभवन येथे कृषी संचालनालयाने आयोजित केलेल्या नैसर्गिक शेतीच्या संकल्पनेला लोकप्रिय करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

(Goa Governor P. S. Sreedharan Pillai said goa government will next few days export Bonsai tree )

Governor P. S. Sridharan Pillai
International Award : गोव्याच्या अमेय चोडणकर यांना आंतरराष्ट्रीय 'टायटॅनियम लायन' पुरस्कार

यावेळी बोलताना पिल्लई म्हणाले की, 'बोन्साय' या संज्ञेमुळे, चीन आणि जपान हे त्याचे प्रणेते असल्याचे मानले जाते. मात्र त्यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. कुंड्यांमध्ये सूक्ष्म झाडे वाढवण्याची कला ही भारतात 5,000 वर्षांपूर्वी सुरु झाली. त्यावेळी भारतात कुंड्यांमध्ये सूक्ष्म झाडे वाढवण्याची कला विकसित झाली होती. त्यामूळे याची सुरुवात भारतात झाली आहे. असे ते म्हणाले.

Governor P. S. Sridharan Pillai
Ponda: पोस्ट कर्मचारी निलंबित प्रकरणी विरेश बोरकर आक्रमक

सध्या राजभवनमध्ये (Goa Raj Bhavan) बोन्सायच्या 72 जाती सध्या आहेत. याचे काम सुरु आहे. त्यामुळे गोशाळा किंवा पशु निवारा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या गोशाळेत देशी गोव्यातील गायीच्या ‘श्वेतकपिला’ या जातीला समर्पित, ज्याला उच्च पौष्टिक A1 दर्जाचे दूध दिले जाते, या गोशाळेचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन करण्यात आले. असल्याची माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

यामूळे यापुढे गोवा सरकार बोन्साय (Bonsai) वनस्पती लागवडीला आजकाल पसंती मिळत आहे. अशा परिस्थितीत या प्लांटद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात त्यामूळे बोन्सायची लागवडीबाबत आता गांभिर्याने विचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

बोन्सायचा वापर आजकाल घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठीही केला जात आहे. त्यामुळे याची मागणीही मोठी आहे. बाजारात त्याची किंमत 200 ते 2500 रुपयांपर्यंत असते. बोन्साय वनस्पतीसाठी अनेक शौकीन लोक तोंडची किंमत मोजायला तयार आहेत. ही स्थिती ओळखत आज गोवा सरकार हा उपक्रम राबवत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com