AAP ने गोवा विधानसभा निवडणुकीत 100 कोटी उधळले, दक्षिण ग्रुपच्या दारू लॉबीकडून घेतले पैसे, ED चा आरोप

दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात ही माहिती दिली आहे.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक मोठे खुलासे केले आहेत. आम आदमी पक्षाने दक्षिण ग्रुपच्या दारू लॉबीकडून 100 कोटी रुपयांची लाच घेऊन त्याचा वापर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली आहे.

चॅरियट प्रॉडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Chariot Productions Media Pvt Ltd) कंपनीचे मालक राजेश जोशी आणि इतर अनेकांचा या संपूर्ण प्रकरणात विविध मार्गांनी सहभाग होता. असे तपासात आढळून आल्याचा आरोप ईडीने केला आहे. चॅरियट प्रोडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने केवळ बँकिंग चॅनेलद्वारे पेमेंट केले नाही तर हवाला नेटवर्कद्वारे रोख पेमेंट देखील केले आणि या पैशाचा खरोखरच 'आप'ला फायदा झाला, व ते पैसे गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले.

पीएमएलए अंतर्गत मनी लॉन्ड्रिंगची चौकशी गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. हवाला नेटवर्कद्वारे 30 कोटी रुपये हस्तांतरित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोव्यातील निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी हे पैसे विक्रेत्यांना देण्यात आले होते.

ED Raid
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 25 पेक्षा अधिकजण जखमी

विक्रेत्यांना प्रसिद्धी आणि AAP चे सर्वेक्षण करण्यासाठी 80 लाख रुपये दिले गेले आहेत. असे गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने स्थानिक न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे. पैशांच्या व्यवहारांची ही मालिका एकमेकांशी जोडलेली असल्याचा आरोप आहे आणि या संपूर्ण गुन्ह्यात 100 कोटींचा समावेश असल्याचे दिसून येते आणि हे पैसे आम आदमी पक्षाच्या नेत्यांसाठी वापरले गेले. त्यात मद्य घोटाळ्याचे शिल्पकार असलेल्या आप सरकारमधील मंत्री आणि सहकारी यांचाही समावेश आहे.

मात्र, आम आदमी पक्षाने हे सर्व आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. अलीकडेच, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रासंदर्भातील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आप खासदार राघव चढ्ढा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पण राघव चढ्ढा यांनी, ईडीच्या तक्रार पत्रात आरोपी किंवा संशयित म्हणून त्यांचे नाव नाही आणि दारू घोटाळ्यात त्यांचे नाव असल्याच्या बातम्यांमध्ये जे काही दाखवले जात आहे ते चुकीचे आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. त्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com