Goa Government: राज्यात पर्यटनवाढीसाठी अत्याधुनिक सुविधांची आवश्‍यकता: नीलेश शाह

Goa Government: सरकारने पर्यटन धोरणानुसार 2030 पर्यंत गोवा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Goa | Nilesh Shah
Goa | Nilesh ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: सरकारने पर्यटन धोरणानुसार 2030 पर्यंत गोवा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु दर्जेदार पर्यटकांना राज्यात आकर्षित करायचे असेल, तर प्रथम अत्याधुनिक साधन सुविधा निर्माण करावी लागणार आहे.

तरच मोठ्या संख्येने दर्जेदार पर्यटक राज्याकडे आकर्षित होणार आहेत, असे मत गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेचे अध्यक्ष नीलेश शाह यांनी ‘गोमन्तक’ शी बोलताना व्यक्त केले. गोवा महाग पर्यटन स्थळ असूनही पर्यटक येतात, कारण येथील समुद्रकिनारे, नागरिक, वारसा आणि संस्कृती जबाबदार आहे.

Goa | Nilesh Shah
Goa Politics: दिगंबर कामतांचे गुजरात मॉडेल, म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी!

निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी राखलेल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्‍यक आहे. आज राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. परंतु रस्ते आणि परिसर देखील स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. या लहान गोष्टी असल्यास तरी देखील त्यांचा प्रभाव पडतो. असे शाह यांनी सांगितले.

स्थानिकांना विश्‍वासात घ्या

गोल्फ कोर्स, मरिना सारखे प्रकल्प आणण्यापूर्वी प्रथम स्थानिकांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक आहे. आज आयआयटी प्रकल्पाला सुद्धा विरोध होत असून सरकारने स्थानिकांचे मत जाणून घेतले पाहिजे. तसेच दर्जेदार पर्यटकांसाठी गोल्फ कोर्स, मरिना प्रकल्पांची गरज आहे. परंतु सरकारने योग्यरीत्या संपूर्ण प्रक्रिया केल्यास भविष्यात नवे प्रकल्प, उपक्रम यशस्वी होऊ शकतात, असे नीलेश शाह यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com