

पणजी: गोव्याच्या मालकीची, मात्र कर्नाटकाने दावा केलेल्या १६ बेटांची पुढील आठवड्यात पाहणी केली जाणार आहे. यासाठी तटरक्षक दल, किनारी पोलिस तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती बंदर कप्तान ऑक्टाव्हिओ रॉड्रिग्ज यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, ‘गोमन्तक’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याशी संपर्क साधून संबंधित भागाला भेट देण्याचे निर्देश दिले. ही बेटे पोर्तुगीजकालीन असल्याने त्यासंबंधीची माहिती शुक्रवारी, सुट्टी असूनही, दिवसभरात संकलित करण्यात आली.
ही बेटे कारवार ते भटकळ या परिसरात पसरलेली असल्याने पाहणीसाठी तटरक्षक दल आणि गोवा किनारी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय मत्स्योद्योग खात्याचाही समावेश केला जाणार आहे. या निर्मनुष्य बेटांवर कोणी अतिक्रमण केले आहे का, याची माहितीही पाहणीदरम्यान संकलित केली जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी पाहणी कधी होणार, याबाबत निर्णय घेतला जाणार असून पुढील आठवड्यातच ही पाहणी होणार असल्याचे ऑक्टाव्हिओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.