Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Goa Staff Selection Commission: सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसार व पारदर्शक निवड प्रक्रियेतून मिळतात, हा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी विविध सरकारी खात्यांतील रिक्त पदे गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्यासाठी वेगाने पावले टाकण्‍यास प्रारंभ झाला आहे.
Goa Staff Selection Commission Recruitment
Goa Recruitment Canva
Published on
Updated on

Goa Staff Selection Commission to Conduct Recruitment for 1,925 Posts

पणजी: सरकारी नोकऱ्यांच्‍या घोटाळ्यामुळे दबाव कमालीचा वाढल्‍याने विविध खात्‍यांतील ‘क’ श्रेणीतील १,९२५ रिक्‍त पदे गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्याचे राज्‍य सरकारने ठरविले आहे. त्‍यासाठी लवकरच जाहिरात प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

सरकारी नोकऱ्यांच्‍या घोटाळ्यात संशयाची सुई काही राजकीय पुढाऱ्यांकडे वळू लागल्‍याने सरकार धास्‍तावले आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसार व पारदर्शक निवड प्रक्रियेतून मिळतात, हा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी विविध सरकारी खात्यांतील रिक्त पदे गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्यासाठी वेगाने पावले टाकण्‍यास प्रारंभ झाला आहे.

Goa Staff Selection Commission Recruitment
Uma Patil Case: पैसे मागितल्यास 'उमा' द्यायची धमकी! दहा वर्षांत जमवली लाखोंची माया; वास्कोप्रकरणी 'दीक्षा'विरुद्धही नोटीस जारी

आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, तर सदस्य दौलत हवालदार आणि मिनिनो डिसोझा हे आहेत. भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्‍यात येईल. ही परीक्षा दिल्यानंतर २४ तासांच्या आत निकाल प्रसिद्ध केला जाईल.

कर्मचारी निवड आयोगामार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी सध्या सरकारविरोधात निर्माण झालेले वातावरण शांत करण्याचा हा प्रयत्न वाटतो. ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणात पोलिस राजकारण्यांचा क्लिन चिट देत असतील, तर ती अत्यंत हास्यास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार हे थातूरमातूर आश्वासने देऊन कोणी केलेले नसावेत. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी निःपक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे. तरच सत्य बाहेर येईल.

- ॲड. अमित पालेकर, राज्य निमंत्रक, आप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com