प्रत्येकाला सरकारी नोकरी देणं अशक्य; खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी चार महिन्यांत खुशखबर

Goa News: विविध क्षेत्रातील कामगारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना श्रमसाथी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे अशक्य आहे; मात्र सर्वांना रोजगार मिळवून देण्यास सरकार प्रयत्नरत आहे. अनेकजण खासगी क्षेत्रात नोकरी करू इच्छित नाहीत, परंतु यावर तोडगा काढणार असून कामगारांसाठी विविध योजना पुढील चार महिन्यांच्या आत राबविणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

श्रमशक्ती भवन येथे कामगार आणि रोजगार आयुक्तालय आणि दिशा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रम गौरव पुरस्कार २०२५ सोहळ्यात बोलत होते. यावेळी आयुक्त डॅरिक नेटो, दिशा फाउंडेशनचे विनीत कुणेकर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील कामगारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना श्रमसाथी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Goa CM Pramod Sawant
Goa Police: बलात्कार प्रकरणांचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे!

आंदोलने नको

आमचे सरकार कोणत्याच कामागारावर अन्याय होणार नाही, यासाठी कटिबद्ध असून त्यांचे हक्क त्यांना मिळायलाच हवेत. सरकार कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यास तयार असून कामगार नेत्यांनी त्यासाठी आंदोलने करू नयेत. त्यांनी आमच्याशी बोलावे. चर्चेतून प्रश्न मिटवावेत. असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Goa CM Pramod Sawant
Nainital: नैनितालमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; हजारो नागरिक उतरले रस्त्यावर, परिसरात धार्मिक तणाव

'त्या' कामगारांना सामावून घेणार

सरकारच्या अनेक खात्यात कंत्राट पद्धतीवर काहीजण मागील अनेकवर्षांपासून कार्यरत असून त्यांना कशाप्रकारे कायम स्वरूपी नोकरीत समावून करून घेता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com