Nainital: नैनितालमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; हजारो नागरिक उतरले रस्त्यावर, परिसरात धार्मिक तणाव

Nainital Crime News: काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
Nainital
Nainital Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तराखंड: नैनितालमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित बलात्कारावरून धार्मिक तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवत तोडफोड केली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने कंत्राटदार असलेला संशयित आरोपी उस्मान, याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात शांतता ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ८ वाजता मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असल्याची बातमी पसरताच सर्वत्र निदर्शने सुरू झाली. काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Nainital
Goa Police: बलात्कार प्रकरणांचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे!

एका विशिष्ट समुदायाच्या काही दुकानांना लक्ष्य करून तोडफोड करण्यात आली तर धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली. पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या जमावाने वाहनांचे नुकसान केले आणि परिसरातील काही घरांवर दगडफेक केली, ज्यामुळे त्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात नैनीताल शहराचे पोलिस अधीक्षक जगदीश चंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन देऊन संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीनंतरही निदर्शने सुरूच राहिल्याने, तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी पहाटे २ वाजेपर्यंत गस्त सुरुच ठेवण्यात आली होती.

Nainital
Goa: 1962 मध्ये 'इंटक'ची स्थापना, वासुदेव गावस यांच्या कष्टांमुळे गोव्यात 'कामगार चळवळी'ला मिळाली नवी उभारी

शांतता राखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com