गोवा सरकारकडून लता दीदींचा सन्मान, नव्या कला वास्तूचे 'लता मंगेशकर कलांगण' असे नामकरण

Ravindra Bhavan At Canacona: काणकोण रवींद्र भवनातील सभागृहाला संजय बांदेकर यांचे नाव देण्यात आले आहे.
गोवा सरकारकडून लता दीदींचा सन्मान, नव्या कला वास्तूचे 'लता मंगेशकर कलांगण' असे नामकरण
Ravindra Bhavan at CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: दक्षिण गोव्यात काणकोण येथे गोवा सरकारने नवे रवींद्र भवन उभारले आहे. या भवनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन पार पडले. काणकोण येथील रवींद्र भवनला भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. तर, सभागृहाला संजय बांदेकर यांचे नाव देण्यात आले आहे.

काणकोण येथे नव्याने रवींद्र भवानाची उभारणी करण्यात आली आहे. या भवनाचे उद्धाटन नुकतेच मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते पार पडले. मूळ गोव्याच्या असणाऱ्या लता मंगेशकर यांच्या नावाने महाराष्ट्रासह देशभरात विविध कला वास्तू आहेत. पण, गोव्यात अशी वास्तू नसल्याने कोणकोण येतील रवींद्र भवानाला 'लता मंगेशकर आंगण' असे नाव देण्यात आले आहे.

तर, रवींद्र भवानातील सभागृहाला माजी मंत्री संजय बांदेकर यांचे नाव देण्यात आले आहे. बांदेकरांचे तैलचित्र देखील सभागृहात लावण्यात आले आहे. मंत्री बांदेकरांनी रवींद्र भवनासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.

उत्तम प्रकारचे कलाकार तयार व्हावेत असाच सरकारचा उद्देश आहे. रवींद्र उभारणीसाठी थोडा विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण, काणकोणचे रवींद्र भवन मडगावपेक्षा एक पाऊल पुढे आहे तर साखळीतील रवींद्र भवनापेक्षा दोन पाऊले पुढे आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

रवींद्र भवनासाठी ५५ कोटी रुपये खर्च आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. या कला भवनाचा केवळ तियात्र आणि नाटकांसाठी होऊ नये तर नवे कलाकार तयार होण्यासाठी व्हावा, असे सावंत म्हणाले. लहान मुलांसाठी याचा उपयोग व्हावा, असेही त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com