New Water Pipelines: '..नव्या जलवाहिन्यांसाठी 2 हजार कोटी लागतील'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Subhash Phaldesai: एवढ्या मोठ्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजेच सुमारे ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे.
Siolim water purification project
Siolim water purification projectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील नळपाणी पुरवठ्याचा आगामी ४०-६० वर्षांचा विचार केल्यास नव्याने जलवाहिन्या घालाव्या लागतील. त्यासाठी किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे मत पिण्याचे पाणीपुरवठा खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील पाणी पुरवठ्याविषयी मंत्री फळदेसाई यांनी राज्यातील पाणी साठा, गरज आणि वितरण व्यवस्थेवर समाजमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पिण्याचे पाणीपुरवठा यंत्रणेचा विचार केला तर दररोज २५० एमएलडी पाण्याचा अपव्यय होत आहे.

एवढ्या मोठ्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजेच सुमारे ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. यामागे पाण्‍याची चोरी, गळती आणि मीटरमधील त्रुटी कारणीभूत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Siolim water purification project
Goa Water Supply: 'प्रत्येकाला सरासरी 12 तास पाणीपुरवठा करू', मंत्री फळदेसाईंचा दावा; गळती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणार

राज्यातील २४ टक्के भागाला दररोज १८ तास पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य सरकार दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील ४० ते ६० वर्षांचा विचार करून राज्यातील जलवाहिन्या बदलणे गरजेचे आहे.

Siolim water purification project
Goa Water Supply: ४० टक्के ‘पाणी’ कुठे मुरते, ते शोधणार! फळदेसाईंचे प्रतिपादन; नव्याने जलवाहिन्या घालण्यात येणार

त्यासाठी नव्याने जलवाहिन्या घालाव्या लागतील आणि त्यासाठी किमान दोन हजार कोटींची खर्च अपेक्षित आहे, त्याशिवाय अजूनही काही भागात पोर्तुगीज काळातील वाहिन्यांचा वापर होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com