Green Lungs: वाढते तापमान, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी गोवा सरकारचे बोल्ड पाऊल; 'ग्रीन लंग्स' उपक्रम राबवण्याचा निर्णय

Goa Government Green Lungs Initiative: वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
Goa government Green Lungs initiative
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वाढते तापमान आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी, गोवा सरकारने 'ग्रीन लंग्स' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याला राज्यातील सर्व पालिकांनी पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. ही योजना नागरी परिसरात हिरवाई वाढवून प्रदूषण कमी करणे, जैवविविधतेला चालना देणे आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी जागा निर्माण करणे, या उद्देशाने राबवली जाणार आहे, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Goa government Green Lungs initiative
Sindhudurg: झाड तोडताना कापली मांडी, साटेली - भेडशीत युवकाचा मृत्यू; गोव्यात होता कामाला

या उपक्रमासाठी आयोजित बैठकीस वनविभाग, नगरविकास विभाग, नगरपालिका प्रमुख तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'शहरी वृक्षारोपण आणि तापमान नियंत्रण' या विषयावर सादरीकरण आणि सखोल चर्चा झाली. वनविभागाने शहरी भागातील मोकळ्या जागा ओळखून त्या ठिकाणी प्रायोगिक प्रकल्प राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यामध्ये सोनसडो भागात मियावाकी पद्धतीने जंगल निर्माण करणे, निवडक भागांमध्ये व्हर्टिकल गार्डन उभारणे, अशा अनेक संकल्पनांचा समावेश आहे. 'स्टुडिओ पॉड' ही संस्था या रचनात्मक कामामध्ये मदत करणार आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी या उपक्रमाला एकमताने पाठिंबा दिला आहे.

ओला कचरा, पावसाचे पाणी आणि नैसर्गिक संसाधने वापरून शहरांमध्ये ही शहरी हिरवाई निर्माण केली जाणार आहे. हा प्रकल्प वन विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त देखरेखीखाली राबवण्यात येणार आहे.

Goa government Green Lungs initiative
Goa Crime: आंबेडकर जयंती दिवशी अल्पवयीन दलित मुलीला मारहाण करुन विनयभंग; ॲट्रॉसीटी, गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद

'ग्रीन लंग्स' म्हणजे काय?

शहरी भागातील हिरवळीच्या जागा, ज्या प्रदूषण कमी करतात, हवामान नियंत्रणास मदत करतात, जैवविविधतेस चालना देतात आणि नागरिकांसाठी शुद्ध वायू, सावली आणि शांतता देणारे स्थान बनतात, त्याला 'ग्रीन लंग्स' असे संबोधले जाते.

असा असेल वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

- सोनसडो येथे मियावाकी पद्धतीने जंगल

- शहरी भागांमध्ये व्हर्टिकल गार्डन्स

- स्थानिक जैवविविधतेला प्राधान्य

- ओल्या कचऱ्याचा खतासाठी वापर

- पावसाचे पाणी साठवून सिंचनासाठी वापर

- शाश्वत आणि पर्यावरणपूरक डिझाईन

- नगरविकास आणि वन विभागाचे संयुक्त नियंत्रण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com