Goa Crime: आंबेडकर जयंती दिवशी अल्पवयीन दलित मुलीला मारहाण करुन विनयभंग; ॲट्रॉसीटी, गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद

Pernem Goa News: अल्पवयीन मुलीचा टीशर्ट फाडून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Case filed under Atrocity and Goa Children’s Act
Goa Dalit girl assaultDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: अल्पवयीन मुलीला मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी समीर कोरगावकर याच्या विरोधात अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी याप्रकरणी पोलिस स्थानकात ठिय्या मांडत कारवाईस होत असलेल्या दिरंगाईबाबत सवाल उपस्थित केला. यानंतर अखेर पोलिसांनी ॲट्रॉसीटी आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिवशी खाजणे - पेडणे येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी समीर कोरगावकर यांच्याविरोधात गोवा बाल कायदा आणि एससी - एसटी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना संशयित समीरने पीडित मुलीला उद्देशून अपमानकारक आणि अश्लिल शब्द वापरून तिचा विनयभंग केला. तसेच, टीशर्ट फाडून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Case filed under Atrocity and Goa Children’s Act
Goa Murder Case: भंगार गोळा करणाऱ्या बेळगावच्या व्यक्तीचा गोव्यात खून; GMC बाहेर आढळला मृतदेह

स्थानिकांचा पेडणे पोलिस स्थानकात ठिय्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती त्याच दिवशी हा प्रकार घडल्याने स्थानिक चांगलेच आक्रमक झाले. घडल्याप्रकाराबाबत कारवाई करण्यास पोलिस दिरंगाई का करतायेत यावरुन स्थानिकांनी पेडणे पोलिस स्थानकात ठिय्या मांडला. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस कारवाई का करत नाहीत? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com