

मुंबई/पणजी: गोवा पोलिसांना कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) योजनेअंतर्गत लॅपटॉप पुरवणारा वैभव ठाकर हा महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत गेल्याने प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. आता ‘अटकेत’ असलेल्या ठाकरला मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत कोणी पोचवले, याबाबत सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेत आहेत.
महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकारी असल्याचे भासवून अनेक व्यावसायिक, व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारा वैभव ठाकर याच्याकडून गोवा सरकारने लॅपटॉप स्वीकारल्याचे उघड झाले आहे.
एप्रिल महिन्यात वैभव आणि त्याची पत्नी प्रियंका जैन यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष देसाई, पोलिस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सरकारला ३१ अद्ययावत लॅपटॉप दान केले होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी हे लॅपटॉप राज्याच्या पोलिस दलाकडे सुपूर्द केले होते. या सोहळ्याची व्हिडिओ क्लिप आणि मुख्यमंत्री कार्यालयाची ‘एक्स’ पोस्ट सध्या व्हायरल होत असून, या दानाविषयी संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, वैभव गोवा, उत्तराखंडमधील व्यावसायिकांना फसवण्याच्या तयारीत होत असे समजते.
२०० कोटींच्या चोरीच्या सोन्याची खरेदी-विक्री
मिळालेल्या माहितीनुसार, हा सोहळा पार पडला तेव्हा वैभव ठाकर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गेल्या वर्षी जूनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामिनावर मुक्त होता. त्या प्रकरणात सुमारे २०० कोटी रुपयांच्या चोरीच्या सोन्याची खरेदी-विक्री केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर होता. त्यामुळे गोवा सरकारकडून दान देणाऱ्याची पार्श्वभूमी तपासली न गेल्याबाबत आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोवा, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील सरकार, पोलिस, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क रहावे. माझ्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार ई-मेलद्वारे मी सांगितला आहे."
- शैलेश जैन, तक्रारदार
पत्नीसह सासू, सासराही सहआरोपी
वैभवच्या अटकेनंतर त्याची पत्नी प्रियंका जैन बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. फसवणुकीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग कसा आणि कुठे केला, याचा तपास करण्यासाठी प्रियंकाची अटक महत्त्वाची असल्याचे तपास पथकातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या गुन्ह्यात वैभव आणि प्रियंका यांच्याबरोबरच त्याचे सासरे अरविंद जैन आणि सासू सुरेखा जैन यांनाही आरोपी करण्यात आलेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.