Gambling Fines: 75 लाखांचा दंड होणार! जुगाराबाबत कडक नियम; अटींचे उल्लंघन केल्यास बसणार मोठा फटका

Goa Gambling Fines: गोवा सार्वजनिक जुगार अधिनियम, १९७६ अंतर्गत परवाना अटींचे उल्लंघन केल्यास आता सुरवातीच्या दंडापासून ते पुनरावृत्तीपर्यंतच्या दंडाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.
Goa casino penalty increase
Goa casino penalty increaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत ऑनशोअर कॅसिनोतील लाईव्ह गेमिंगविषयी स्टिंग ऑपरेशनचे धक्कादायक पुरावे सादर केल्यानंतर, राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने तात्काळ हालचाल करत दंडाच्या रकमेत मोठ्या वाढीची अधिसूचना जारी केली आहे.

या ६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, गोवा सार्वजनिक जुगार अधिनियम, १९७६ अंतर्गत परवाना अटींचे उल्लंघन केल्यास आता सुरवातीच्या दंडापासून ते पुनरावृत्तीपर्यंतच्या दंडाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

Goa casino penalty increase
Candolim Casino Raid: कांदोळीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा, 'अंदर-बाहर' जुगार खेळताना 11 जणांना रंगेहाथ पकडलं

त्यानुसार पहिल्या उल्लंघनासाठी २५ लाख, दुसऱ्यावेळी ५० लाख तर तिसऱ्या व पुढील उल्लंघनांसाठी ७५ लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच कॅसिनोचा परवाना रद्द करण्याची किंवा ठेव रक्कम जप्त करण्याची तरतूदही अधिसूचनेत आहे. ही सुधारित दंड प्रणाली तत्काळ प्रभावाने लागू करण्‍यात आली आहे.

Goa casino penalty increase
Goa Casino Death: तोल जाऊन पडला आणि बुडाला! मांडवीत पडून मृत्यू पावलेल्या युवकाची पटली ओळख; अतिमद्यप्राशनाचा संशय

दरम्‍यान, या निर्णयामुळे कॅसिनो व्यवसायावर नियंत्रण येणार असून परवाना अटींचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाला अधिक बळ मिळणार आहे. दुसरीकडे अंमलबजावणीत शिथिलता आल्यास विरोधक सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेतच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com