
पणजी: राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या जेवणासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. आता प्रत्येक कैद्यामागे प्रतिदिन ९० रुपयांऐवजी १२३ रुपये खर्च केले जाणार आहेत.
वाढलेले दर तत्काळ लागू करण्यात आले असून, कारागृह प्रशासनाने याबाबतचा सुधारित आदेश जारी केला आहे. कारागृह अतिरिक्त महानिरीक्षक डॉ. एस.पी. नाईक गोलतेकर यांनी सांगितले की, महागाईचा दर, अन्नधान्यांच्या वाढत्या किमती आणि पोषणमान सुधारण्याची गरज लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आली आहे. सध्या कोलवाळच्या कारागृहात ६३५ कैदी आहेत.
कारागृहातील कैद्यांना न्याहरीत एक अंडे दिले जाते. मासे व आठवड्यातून एकदा चिकनचा समावेश त्यांच्या आहारात असतो. कैद्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण यामध्ये पौष्टिकता आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निकष आहेत. आठवड्यातून एक दिवस गोड पदार्थ, तर सणासुदीच्या दिवशी विशेष भोजन दिले जाते.
या निर्णयामुळे कारागृहांतील भोजन व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नव्या दरांसह स्थानिक बाजारभावानुसार आहार नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पोषणमानाच्या निकषानुसार कैद्यांना आवश्यक कॅलरीज, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतील याची खात्री करण्यासाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.
- डॉ. एस.पी. नाईक गोलतेकर, कारागृह अतिरिक्त महानिरीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.