पणजी: गोवा राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेमध्ये बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी लस घेतली नसल्यामुळे बळींची आकडेवारी वाढत आहे. मागील महिन्यात झालेल्या 717 बळींपैकी 52 टक्के लोकांनी लस घेतलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे, असे कळकळीचे आवाहन आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी आज केले.
आरोग्य विभागाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बोरकर म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने यावेळच्या लाटेचा परिणाम तितकासा जाणवला नाही. लोकांना सर्दी, पडसे, खोकला जाणवला असला तरी लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता जाणवली नाही. मात्र ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या रुग्णालयात असलेल्या अनेक रुग्णांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे सध्या तरी लसीकरणाला पर्याय नाही, असे बोरकर म्हणाले.
1794 रुग्ण कोरोनातून बरे
राज्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 6 बळी गेले असून 34 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी पॉझिटिव्हिटी रेट 19.57 टक्के होता, तर सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 870 आहे. गेल्या 24 तासांत नवे 910 बाधित रुग्ण सापडले. काल 1,794जण कोरोनातून बरे झाले. तर उपचारासाठी भरती केलेल्या 23 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.