DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांवर, जुलैपासून मिळणार लाभ

Goa Government Employees Dearness Allowance Increased: केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली होती.
Goa Government Employees Dearness Allowance Increased
Goa Government Employees Dearness Allowance IncreasedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली होती. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता गोवा राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

नव्या निर्णयानुसार गोव्यातील पात्र कर्मचाऱ्यांना आता ६० टक्क्यांऐवजी ६३ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात काही प्रमाणात वाढ होणार आहे. विशेषतः वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

Goa Government Employees Dearness Allowance Increased
Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

दरम्यान, महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढीव डीएचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार असून, संबंधित कालावधीतील थकबाकीही नियमानुसार देय ठरणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत राज्य सरकारनेही महागाई भत्त्याचा दर वाढवल्याने गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.