खाणव्याप्त भागातील ट्रक धारकांसाठी महत्वाची बातमी; ट्रकांचा ‘फिटनेस' दंड गोवा सरकारकडून रद्द

गणेश गावकर यांच्यासोबत ट्रकवाल्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही दंडाची कैफियत मांडली होती.
खाणव्याप्त भागातील ट्रक धारकांसाठी महत्वाची बातमी; ट्रकांचा ‘फिटनेस' दंड गोवा सरकारकडून रद्द
truckdainik gomantak
Published on
Updated on

फोंडा: खाणव्याप्त भागातील ट्रकांच्या ‘फिटनेस''साठी लागू केलेला दर दिवशी पन्नास रुपयांचा दंड वाहतूक खात्याने रद्द केल्याने सावर्डे मतदारसंघातील धारबांदोडा तालुका ट्रक असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानण्यात आले आहेत.

बुधवारी (18 सप्टेंबर) फोंड्यात ट्रक असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष विनायक ऊर्फ बालाजी गावस यांनी ही माहिती दिली. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खाण व्यवसाय पुन्हा एकदा जोमाने सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न केले आहेत. सध्या खाणींचा लीलाव होत असल्याने ट्रकवाल्यांना पूर्णवेळ काम मिळेल, अशी आशा विनायक गावस यांनी व्यक्त केली.

खाणींवरील ट्रक मागची दहा वर्षे बंदच आहेत. त्यामुळे आता नव्याने त्यांचे ‘पासिंग'' करायचे झाले तर सरकारने निर्धारित केलेला फिटनेस दाखल्यासाठीचा दंड भरणे आवश्‍यक होते. हा दंड दर दिवशी पन्नास रुपये होता.

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यासोबत ट्रकवाल्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही दंडाची कैफियत मांडली होती, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले होते, त्यानुसार आता वाहतूक खात्याने ट्रकांचा फिटनेससाठीचा दंड माफ करून फक्त एक हजार रुपये ठेवला आहे, त्यामुळे ट्रकवाल्यांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Monsoon Session 2026
Goa Government Development Exhibition
Pramod Sawant Convoy Accident
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com