
पणजी: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अन्वये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तींवर राज्यभरात निर्मिती, आयात आणि विक्री करण्यास बंदी घातली आहे.
पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशा मूर्ती उत्पादन करणाऱ्या, साठवणूक करणाऱ्या, विक्री करणाऱ्या जागांवर छापे टाकून जप्त कराव्यात, वाहन ताब्यात घ्यावे आणि संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंदवावेत, असे निर्देश पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी आज दिले आहेत.
राज्यातील विविध भागात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्ती आणून विक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या होत्या. पीओपी मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत आणि त्यामुळे नदी, समुद्रकिनारे आणि इकोसिस्टमवर त्याचा अपायकारक परिणाम होतो, असे नमूद करून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पीओपी मूर्तींचा वापर पूर्णपणे निषिद्ध ठरवण्यात आला आहे.
या मूर्तींवर लावण्यात येणाऱ्या रंगांमध्ये पाऱ्यापासून कॅडमियमपर्यंत अनेक घातक रसायने असतात. पाण्यात राहणाऱ्या सजीवांवर आणि मानवाच्या आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचे आदेशात स्पष्ट केलेय.
केले आहे. अंमलबजावणीसाठी विविध सूचना केल्या आहेत. वाणिज्य कर आयुक्तांनी परवाना असलेल्या दुकांनांमध्ये पीओपी मूर्ती विक्री झाल्यास त्यांच्या परवान्यांवर कारवाई करावी आदी. प्रदूषण नियंत्रण मंडळ १ ते १४ ऑगस्टदरम्यान चित्रशाळांची संयुक्त तपासणी करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.