GMC : ‘गोमेकॉ’त ‘पदव्यूत्तर’साठी आरक्षण; ‘उटा’कडून स्वागत

16 वर्षे प्रलंबित राहिलेली मागणी अखेर मान्य
prakash velip
prakash velipDainik Gomantak

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी ओबीसी, एसटी व एससी समाजातील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 16 वर्षे प्रलंबित मागणी सरकारने मान्य केल्याने हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे ‘उटा’ चे चेअरमन प्रकाश वेळीप यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे तसेच राज्य सरकारचेही त्यांनी आभार मानले.

राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाप्रमाणे ओबीसींना 27 टक्के, एससींना 12 टक्के व एसटी विद्यार्थ्यांना 2 टक्के आरक्षण मिळणार आहे.अशा प्रकारचे आरक्षण केवळ गोव्यात नव्हते. हे आरक्षण देशाच्या घटनेनुसार असल्याचे वेळीप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विश्र्वास गावडे, सतीश वेळीप उपस्थित होते.

prakash velip
Gomantak Tanishka's Purument fest 2023 : ‘पुरूमेंत’ गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य घटक! पणजीत आयोजन

राजकीय आरक्षणासाठी ‘उटा’ कटिबद्ध !

एसटी समाजासाठीच्या राजकीय आरक्षणासाठी ‘उटा’ संघटना काहीच प्रयत्न करीत नाही, असा आरोप होत आहे. पण या आरोपांत तथ्य नाही. ‘उटा’तर्फे सर्व स्तरावर राजकीय आरक्षणासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना सुद्धा निवेदने देण्यात आली आहेत.

‘उटा’ची 2003-04 साली 12 महत्वाच्या मागण्यांसाठी स्थापना झाली. त्यातील अनेक मागण्या पूर्णही झाल्या आहेत. मात्र 19 वर्षांपासून राजकीय आरक्षणासाठी आम्ही झटत असल्याचे प्रकाश वेळीप यांनी सांगितले. 2027च्या विधानसभेत निश्‍चितच एसटी समाजाला 12 टक्के राजकीय आरक्षण मिळेल, असा विश्र्वास वेळीप यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com