Porvorim Flyover: पर्वरी उड्डाणपूल सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्‍घाटनाची शक्यता

Goa Porvorim flyover completion September: पर्वरी येथील महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाचे काम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
Porvorim Flyover
Porvorim FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरी येथील महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाचे काम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे बांधकामाच्या काळात नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्वरी जंक्शनवरील वाहतूक सुरळीत होऊन परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Porvorim Flyover
Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाकडे लागले आहे.

Porvorim Flyover
Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

कामाचा वेग वाढवला : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, पर्वरी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उभारण्यात येत असलेला हा उड्डाणपूल राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे.

या प्रकल्पामुळे पणजी, म्हापसा आणि उत्तर गोव्याच्या विविध भागांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, वाहनधारकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. सध्या कामाचा वेग वाढविण्यात आला असून संबंधित यंत्रणांना वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com