Goa: कृषीप्रधान राज्य बनविण्याचे सरकारचे ध्येय

स्वातंत्र्य टिकवुन ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी राजकीय, सामाजीक मतभेद बाजुला सारुन एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे
उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर

उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर

Dainik Gomantak

Published on
Updated on

सासष्टी: गोवा कृषीप्रधान (Agricultural) राज्य बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी सरकारने (government) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अनेक कृषी योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळवुन दिला आहे. नवी पिढी शेतीकडे वळत आहे ही एकदम चांगली गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले.

गोवा मुक्तीच्या (Goa Liberation) 60व्या वर्धापनदिनानिमित्त दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात झेंडावंदन केल्यावर व पोलिसांकडुन (Police) मानवंदना स्विकारल्यावर ते बोलत होते. शेतकऱ्यांना शेती विषयक साधने विकत घ्यायला किंवा सरकारी अनुदान मिळविण्यासाठी एट सोर्स सुविधा तसेच सामुहीक शेती योजना मिळवुन दिल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर</p></div>
Goa Liberation Day: नौदलाकडून सायकल राइडचे आयोजन

गोवा मुक्तीच्या 60वे वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) जे 300 कोटी रुपये दिले त्याचा योग्य तो वापर सरकार करीत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यानी अनेक साधन सुविधा कामाचा पाया रचला. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गोव्याने सर्वांगीण विकासाकडे झेप घेतली असेही उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. स्व. पर्रीकर याच्या स्वप्नपुर्तीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कसोशीने प्रयत्नशील आहेत.

गोव्यात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे काही भागात कचरा, दुर्गंधी आहे, वाहतुकीवर परिणाम होत आहे. पण एकदा ही कामे पुर्ण झाली की नंतरचा गोवा सुंदरच असेल असेही कवळेकर म्हणाले.

स्वातंत्र्य टिकवुन ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी राजकीय, सामाजीक मतभेद बाजुला सारुन एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. त्यांनी या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांचा खास उल्लेख करुन सांगितले की त्यांनी या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांचा खास उल्लेख करुन सांगितले की त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच मुक्त गोव्यात वावरत आहोत.

<div class="paragraphs"><p>उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर</p></div>
Goa Liberation Day: पहिल्या सागरी चाचण्यांसाठी रवाना

उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटीयाल, पोलिस अधिक्षक अभिषेक धनिया यानी स्वागत केले. पोलिस निरिक्षक कपील नायक यांच्या समवेत त्यानी परेडची पहाणी केली.

वेगवेगळ्या संस्था, शाळांनी (school) मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचलनात काणकोण येथील जवाहर नवोदय विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. श्री दामोदर वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी गटाला दुसरे तर नावेलीच्या रोझरी कॉलेजच्या आर्मी बॉईजना तिसरे बक्षिस मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल यानी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com