Gomantak Bhakti Sandhya
Gomantak Bhakti SandhyaDainik Gomantak

Gomantak Bhakti Sandhya: मांद्रे, वाळपईत 28, 29 जुलैला ‘भक्‍तिसंध्‍या’

संगीताची मेजवानी : ‘गोमन्‍तक’, कला व संस्कृती संचालनालय आयोजक
Published on

Gomantak Bhakti Sandhya : नागरी प्रगतीसाठी सामाजिक पातळीवर भरीव योगदान देणाऱ्या दैनिक गोमन्तकच्या वतीने आणि कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने येत्या २८ व २९ जुलैला सायंकाळी ६.०० वाजता अनुक्रमे दीनदयाळ हॉल-मांद्रे आणि लक्ष्मी मेमोरियल-हॉल वाळपई येथे ‘भक्‍तिसंध्या’ या बहारदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा संपूर्ण कार्यक्रमात नामवंत कलाकार भक्‍तिगीते, भावगीते व नाट्यगीते सादर करतील. सहभागी गायक-कलाकारांमध्ये सुप्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गावकर, पल्लवी पाटील, सिया पै व अश्‍विनी अभ्यंकर यांचा समावेश आहे

तर वादक कलाकारांमध्ये उत्पल सायनेकर (तबला), धनराज मडकईकर (संवादिनी), किशोर तेली,

पवन तारी (पखावज), योगेश रायकर (तालवाद्य) यांचा सहभाग असेल. निवेदनाची बाजू गोविंद भगत सांभाळणार असून, ध्वनी संयोजन सिद्धार्थ नाईक व बंटी फोंडेकर यांचे आहे. या कार्यक्रमाचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Gomantak Bhakti Sandhya
Goa Assembly Monsoon Session: 'वीज खात्यात 145 कोटींचा घोटाळा', भाजप आमदारांचा सरकारला घरचा आहेर

श्रोत्‍यांसाठी सांगीतिक नजराणा

वाचन संस्‍कृती वृद्धिंगत करण्‍यासोबत साहित्‍य, संगीत कलेच्‍या उन्‍नयनासाठी ‘गोमन्‍तक’ने नेहमीच नानावीध उपक्रम राबवले. वाचक असोत वा श्रोते त्‍यांच्‍यासमोर दर्जेदार सादरीकरण करून अभिरुची अधिक संपन्‍न करण्‍याचा सदोदित प्रयत्‍न राहिला आहे. मांद्रे व वाळपई येथे होणारे सांगीतिक कार्यक्रम श्रोत्‍यांसाठी नजराणा ठरतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com