Goa University: गोवा विद्यापीठ की पिठाची गिरण? 'खरी कुजबुज'

प्राध्यापकाला चांगले गुण दिले म्हणून त्याचे वरिष्ठ असलेल्या उप-अधिष्ठात्यांना काढून टाकण्यात आले.
Goa University |Goa News
Goa University |Goa News Dainik Gomantak

कोणतेही कारण न देता एका प्राध्यापकाला काढून टाकल्यानंतर आता गोवा विद्यापिठातील एका प्राध्यापकाचा प्रोबेशन पीरियड कोणतेही कारण न देता एका वर्षाने वाढविण्यात आला आहे. काढून टाकलेल्या प्राध्यापकाला चांगले गुण दिले म्हणून त्याचे वरिष्ठ असलेल्या उप-अधिष्ठात्यांना (व्हाईस डीन अ‍ॅकडमिक) काढून टाकण्यात आले.

खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील प्राध्यापकावर अन्याय होत असेल तर मग इतर गोमंतकीयांची काय कथा? एका प्राध्यापकावर अन्याय यापेक्षाही चिंताजनक बाब ही आहे की, काढून टाकलेल्या प्राध्यापकाप्रमाणेच तुमचीही अवस्था केली जाईल, अशा सूचनावजा धमक्या इतर गोमंतकीय प्राध्यापकांना दिल्या जात आहेत.

चांगल्या गोमंतकीय प्राध्यापकांची गळचेपी केली जात आहे. त्यांची छळवणूक करून, बाजूला सारून इतर राज्यांतील सगेसोयरे घुसवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे, गोवा विद्यापीठाचे रँकिंग घसरण्यामागे हेसुद्धा एक कारण असल्याची कुजबूज कॅम्पसमध्ये सुरू आहे. विद्यापीठ आहे की पिठाची गिरण, असा सवाल कॅम्पसमध्ये दबक्या आवाजात विचारला जात आहे.

फेरबदल की राजकीय वावड्या?

म्हापसा नगरपालिकेतील फेरबदलाचे कवित्व मागील काही महिन्यांपासून सुरूच आहे. मात्र अद्याप हा बदल सत्ताधाऱ्यांकडून घडवून आणलेला नाही. नगराध्यक्षांना पायउतार होण्याची सूचना आली असली तरी मॅडम साहेबांनी आपला राजीनामा दिलेला नाही.

त्‍यामुळे मॅडमना कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे का, असा प्रश्‍‍न शहरात विचारला जात आहे. दुसरीकडे मॅडम पायउतार होत नसल्याने उपनगराध्यक्ष मात्र सुशेगाद आहेत. कारण जोवर नगराध्यक्ष पदभार सोडत नाही, तोवर उपनगराध्यक्षपदाची खुर्चीही शाबूत राहणार आहे.

त्यामुळे ते बरेच निवांत आहेत. आता हा फेरबदल प्रत्यक्षात होतो की या फक्त राजकीय वावड्याच, हे येणारा काळच ठरवेल.

मुख्यमंत्र्यांनी ऐकला गुरूचा सल्ला!

गुरू हा श्रेष्ठच! गुरू एकलव्याच्या जमान्यातही श्रेष्ठ होता आणि आताही आहे. सगळ्याच शिक्षकांना समाज मान देतो. एका गुरूने साळ नदीच्या प्रदूषणावर मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्‍ल्यावर आम्‍ही याच सदरात दखल घेतली होती.

संजय सावंत हे शिक्षक साळ नदीच्या प्रदूषणावर सातत्याने समाजमाध्यमांवर आवाज उठवितात. मुख्यमंत्री मडगावात आले होते तेव्‍हा साळ नदीच्या प्रदूषणावर नजर मारावी असा सल्ला संजय गुरुजींनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांना दिला होता आणि मुख्यमंत्र्यांनी एका आज्ञाधारी शिष्याप्रमाणे साळ नदीच्या प्रदूषणाचा आढावा घेतला. आता गुरू संजयही खूष व विदेशही खूष!

म्‍हणून मिरची झोंबली?

सत्य हे नेहमीच कटू असते असे म्हणतात. गेली अनेक वर्षे साळ नदीत खुलेआम सांडपाणी सोडून या नदीचा गळा घोटला जातोय. मात्र सासष्टीतील सर्व राजकारणी मूग गिळून गप्प आहेत. या प्रदूषणावर ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आवाज उठविला म्हणून अनेकांना मिरची झोंबली.

व्हेंझी यांनी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरले. त्‍यामुळे भाजपच्या एसटी मोर्चाला बरेच दुःख झाले. त्‍यांनी हा विषय एकदम साधा व छोटा असे जे विधान केले. बाबांनो, काहीही बरळू नका.

साळ नदीचे प्रदूषण चिल्लर विषय असेल तर मुख्यमंत्री का आले प्रदूषणाची पाहणी करायला? ∙∙∙सत्य हे नेहमीच कटू असते असे म्हणतात. गेली अनेक वर्षे साळ नदीत खुलेआम सांडपाणी सोडून या नदीचा गळा घोटला जातोय.

मात्र सासष्टीतील सर्व राजकारणी मूग गिळून गप्प आहेत. या प्रदूषणावर ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आवाज उठविला म्हणून अनेकांना मिरची झोंबली. व्हेंझी यांनी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरले.

त्‍यामुळे भाजपच्या एसटी मोर्चाला बरेच दुःख झाले. त्‍यांनी हा विषय एकदम साधा व छोटा असे जे विधान केले. बाबांनो, काहीही बरळू नका. साळ नदीचे प्रदूषण चिल्लर विषय असेल तर मुख्यमंत्री का आले प्रदूषणाची पाहणी करायला?

चोरीचे साटेलोटे

गोव्यातील प्रत्येक खात्याने बदनाम होण्याचा चंगच बांधलेला आहे व त्यात नागरीपुरवठा खाते आघाडीवर आहे असे म्‍हटले तर ते वावगे ठरणार नाही. कोरोना काळात गरजूंना वितरीत करण्यासाठी मिळालेले मोठ्या प्रमाणातील धान्य व साखर सडण्‍याच्‍या प्रकरणात माजी संचालक निलंबनाची शिक्षा भोगत असतानाच आता या खात्याच्या गोदामातील धान्याच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

एक खरे की राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य लागत नाही तर मग ते आणले तरी का जाते, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर येते ते अशाच चोरबाजारासाठी. मग खाते आपला त्याच्याशी संबंध नाही असे कसे म्हणू शकते? रवी पात्राव याचे उत्तर देऊ शकतील का?

Goa University |Goa News
Vijay Sardesai: सरकारच्‍या आशीर्वादाशिवाय धान्याचा काळाबाजार अशक्य

मुख्‍यमंत्री सावंत आले...!

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत बुधवारी पत्रकारदिनाच्‍या कार्यक्रमाला उपस्‍थित होते. तेथे त्‍यांचे ‘गुज’चे अध्‍यक्ष राजतिलक नाईक यांनी तोंडभरून कौतुक केले. त्‍याला कारणही साजेसे होते. पत्रकारांच्‍या निवृत्तिवेतनापासून कृतज्ञता निधी व पत्रकार भवन अशा अनेक मागण्‍या त्‍यांनी चुटकीसरशी सोडविल्‍या.

एवढेच नव्‍हे तर त्‍यांनी या समारंभात कार्यक्रमाला साजेसे सुरेख भाषणही केले. त्‍यात त्‍यांनी केवळ पत्रकारितेच्‍या विधायक गोष्‍टींचाच उल्लेख केला. एक गोष्‍ट मात्र खरी, सावंतांवर कोणीही कितीही परखड टीका केली तरी ते पर्रीकरांसारखे पत्रकार किंवा संपादकाला फोन करून डिवचत नाहीत. ते म्‍हणाले, माझ्‍यावर चांगले लिहिले तर मात्र मी कधी तरी फोन करतो.

पत्रकारांच्‍या समारंभाला बराच वेळ ते उपस्‍थित होते. काहींना त्‍यांनी फोटोही काढू दिले. एकूण त्‍यांनी या भरगच्च समारंभात पत्रकारांची मने जिंकली.

पेडण्‍यात चर्चा नव्‍या मोबाईलची

पंधरा दिवसांपूर्वी आमदाराने एका पत्रकाराच्या हातातील मोबाईल झिडकारून टाकण्याची घटना पेडणेत घडली. आमदार साहेबांनी मोठं मन करून ‘त्या’ पत्रकाराला नुकसान भरपाई म्हणून नवा कोरा मोबाईल ‘गिफ्ट’ दिला. आता मोबाईल दिल्यानंतर हे प्रकरण कुठंतरी शांत होणार असे सर्वांना वाटत होते.

मात्र घडलं उलटंच. आता चर्चा सुरू झाली आहे ती नव्‍या मोबाईलची. सर्वजण त्‍या पत्रकाराकडे मोबाईलबाबत उत्‍सुकतेने विचारणा करीत आहेत. त्‍यामुळे तो पत्रकार हैराण झाला आहे. ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्‍हणण्‍याची वेळ त्‍याच्‍यावर आलेली आहे. तालुक्यातील आजी-माजी सरपंचांनी जेव्हा पत्रकाराला मोबाईलबाबत छेडले, तेव्हा मात्र तो भडकला.

रागारागात त्‍याने सरळ त्‍यांना सांगूनच टाकले की, मी आत्ताच हा मोबाईल परत करतो म्‍हणून. पण परत केला की नाही हे देवालाच माहीत. एक मात्र खरे, त्‍याला नवा कोरा स्‍मार्टफोन मिळाल्‍यामुळे त्‍याच्‍याबरोबर असणाऱ्या अनेकांचा तिळपापड झालेला आहे.

संधीचे सोने करणारी भोजनालये!

विनापरवाना चालणारी भोजनालये व खाद्यपदार्थ आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेली कारवाई स्‍तुत्‍य असली तरी ती पुरेशी नाही. कारण अनेक भागांत अशा आस्थापनांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे व त्यामानाने कारवाई अत्यल्प आहे. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे एफडीएचे काम सरकारी कार्यालयीन वेळेत चालते तर अशी आस्थापने त्या वेळेनंतर सुरू होतात व रात्री उशिरापर्यंत चालतात.

दक्षिण गोव्यातील घोगळ, दवर्ली, रुमडामळसारख्या वसाहतीत तर घरोघर अशी आस्थापने आरोग्यविषयक सर्व नियम पायदळी तुडवून सुरू आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार का, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com