Tax Devolution Instalments
Tax Devolution InstalmentsDainik Gomantak

Tax Devolution Instalments: नियमित मासिक कर हस्तांतरणात गोव्याला 450.32 कोटी रुपये

Published on

केंद्र सरकारने आज (10 ऑगस्ट ) राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण रक्कम वितरीत केली. 58,332.86 कोटी रुपयांप्रमाणे राज्य सरकारांना दोन हप्त्यांपोटी 1,16,665.75 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. गोव्याला दोन हप्त्यांत 450.32 कोटी रुपये मिळाले आहेत. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण करत असते. 10 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाची रक्कम वितरीत केली.

Tax Devolution Instalments
Goa Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्यात एकूण 79 टक्के मतदान

यामध्ये सर्वाधिक 20,928 .62 कोटी रूपये उत्तर प्रदेशला, 11,734.22 कोटी रूपये बिहारला, 9,158.24 कोटी मध्य प्रदेशला आणि 7,369.76 कोटी रूपये महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत. तर, गोव्याला दोन हप्त्यांत 450.32 कोटी रुपये मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com