Department Of Legal Metrology: गॅस सिलिंडर खरेदी करताय? सतर्क रहा; वजन माप खात्याने केलीय 11 विक्री केंद्रांवर कारवाई

96 हजार रुपये दंड वसूल : ऑक्टोबर २०२२ पासून ११ विक्री केंद्रांवर कारवाई
Department Of Legal Metrology:
Department Of Legal Metrology:Dainik Gomantak
Published on
Updated on

Department Of Legal Metrology स्वयंपाकाचा गॅस घरगुती आणि व्यावसायिक विक्री पुरवठा करणाऱ्या डिलर्सकडून कमी वजनाचे सिलिंडर दिल्याबद्दल वजन माप खात्याकडून ११ विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात १७९ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत, ही कारवाई ऑक्टोबर २०२२ पासून करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करताना ९६ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

Department Of Legal Metrology:
Classical Music: भारतीय संगीतात संस्कार, संयम, तपश्‍चर्या दिसते

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला वजन माप खात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले हे की, राज्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तू विक्री करणारी १६६ दुकाने परवानाधारक आहेत.

त्यात मोबाईल शॉपींचाही समावेश आहे. या दुकानांची २०२० पासून आत्तापर्यंत झालेल्या तपासणीअंती ५६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तो दंड ५ हजारांपासून ते ४ लाख रुपयांपर्यंत आकारण्यात आल्याचे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

Department Of Legal Metrology:
Churchill Alemao Resignation: चर्चिल आलेमाव यांची TMC मधून एक्झिट!

या दंडापोटी वजन माप खात्याने १७ लाख १६ हजार रुपये दंडाच्या रूपाने वसूल केले आहेत. त्याशिवाय १९ फटाके विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील एका विक्रेत्याविरुद्धचा दावा मडगाव प्रथम वर्ग न्यायालयात प्रलंबित आहे.

त्याशिवाय ९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ हजार रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत दंड आकारला आहे. नऊजणांकडून एकूण २ लाख ८५ हजार रुपये दंड खात्याने वसूल केला आहे.

तसेच १७५ विविध व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली, त्यात ६० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, १३ लाख ९० हजार रुपये दंडापोटी वसूल केले असल्याचे अहवालावरून दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com