Goa Politics: दाबोळीत कॉंग्रेसच्या 33 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील भाजपा कार्यालयातील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Congress workers join bjp in dabolim
Congress workers join bjp in dabolim Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काँग्रेसचे (Congress) वास्कोतील ज्येष्ठ कार्यकर्ते वामन चोडणकर, काँग्रेसचे दाबोळी गट उपाध्यक्ष अॅड. सावियो नोरोन्हा यांच्यासह दाबोळी मतदारसंघातील 33 कार्यकर्त्यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला. मंत्री माविन गुदिन्हो यांनी या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले. (Congress workers join bjp in dabolim)

दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील भाजपा कार्यालयातील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्या अॅड. अनिता थोरात, नगरसेवक सुदेश भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य जयंत जाधव, दाबोळी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप सूद, संतोष केरकर, तुळशिदास पटेकर, लिगोर मोंतेरो व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि काँग्रेसच्या मच्छीमार विभागाच्या गोवा राज्याचे अध्यक्ष वामन चोडणकर यांच्यासह दाबोळी काँग्रेस गटाचे उपाध्यक्ष अँड सावियो नौरोन्हा यांनी 33 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यात अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस पक्षावर सडकून टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना खाण लुटणारे असे संबोधून त्या लुटीमुळेच आज गोवा आर्थिक अडचणीत आल्याचा आरोप केला. काँग्रेसने केवळ आर्थिक घोटाळेच केले. दिगंबर कामत यांना काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी गवतातील साप संबोधलेले असून या पक्षाकडे आता नेताच शिल्लक राहिलेला नाही. हे काँग्रेसवाले आता लोकांची नाहक दिशाभूल करून फूट घालू पाहात आहेत. लोकांची मने नासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारने जी बिले विधानसभेत संमत केली ती या राज्यातील जनतेच्या हिताचीच आहेत. त्याचा लाभ सर्वांनाच मिळणार आहे. मात्र, काँग्रेस गैरप्रचार करीत आहे. तरीही या प्रचाराला लोक बळी पडणार नाहीत. आज गोवाभर भाजपाचेच वारे आहे. समाजाचा सर्वांगीण विकास भाजपाच करू शकतो याची खात्री लोकांना झालेली आहे. या विश्वासामुळेच इतर पक्षांचे कार्यकर्तेही भाजपाकडे वळत आहेत, असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.मंत्री माविन गुदिन्हो व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.

Congress workers join bjp in dabolim
Goa: आदिवासी समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

भाजपात प्रवेश केल्यानंतर वामन चोडणकर यांनी भाजपा प्रवेश हा आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. मंत्री माविन गुदिन्हो हे आपले एकेकाळचे सहकारी त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी योग्य निर्णय घेऊन पक्षांतर केले म्हणूनच दाबोळीत विकास पहायला मिळाला. भाजपाचे आणि जनतेचेही भले झाले आपण 31 वर्षे काँग्रेससाठी जीव लावून काम केले.मात्र, त्या पक्षात कार्य करणाऱ्यांना मान मिळत नाही. आज काँग्रेस पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यांना भवितव्य राहिलेले नाही. उलट भाजपा शिस्तबद्ध पक्ष आहे. चांगले संघटन आहे. या पक्षाचा अंत होणे शक्यच नाही. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी आणि काश्मीरचे 370 वे कलम रद्द करण्याच्या माजप सरकारच्या धाडसी निर्णयाने आपण भारावून गेलो. आपल्यालाही या पक्षाच्या कार्याचा अभिमान वाटला, असे चोडणकर म्हणाले. अॅड. सावियों नोरोन्हा यांनीही भाजपा व मंत्री गुदिन्हो यांच्या कार्याची स्तुती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BJP plans to increase women representation in Goa Assembly
Bank fraud of 75 lakh rupees in Goa
Goa Bicholim marigold flower cultivation
Farmers demand rejection of mining NOC in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com