Goa Ganesh Festival: गोव्यात उत्साहाला उधाण!

ऊर्जादायी वातावरण : राज्यात आज गणरायांचे पूजन
Goa Ganesh Festival
Goa Ganesh FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संकटमोचक, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनासाठी राज्य सज्ज झाले असून सर्वत्र आनंदी आणि उर्जादायी वातावरण निर्माण झाले आहे. चतुर्थीसाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अबालवृद्ध तयारीत असून ठिकठिकाणी धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील सर्व बाजारपेठा गजबजलेल्या असून गोडधोडीसाठी मिठाईच्या दुकानात गर्दी दिसत आहे.

(Goa Ganesh Festival Festival In Goa)

Goa Ganesh Festival
Sonali Phogat Case: सोनालींच्या पीए सांगवानने नेमलेल्या ‘त्या’ संगणक ऑपरेटरचा शोध सुरू

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्यांदाच काहीशा कमी झालेल्या कोरोनाच्या वातावरणामुळे राज्यात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत होत आहे. राज्यभरातील चित्रशाळांमधून आज मंगळवारपासूनच भाविकांनी ‘बाप्पा’ला घरी नेत प्रतिष्ठापणा करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाच्या घराघरात, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने श्री गणरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्या येईल. कोरोनामुळे अनेक सण-उत्सवांवर बंधने घालावी लागली. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा घरातील, सार्वजनिक मंडळातील गणेशोत्सवाला भक्तीचा जोश आला आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोनासंबधी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

‘घुमट’ घुमणार

गणपतीसमोर घुमट, समेळ आणि कासाळचा आवाज घुमणार आहे. या मंगलमयी वातावरणात गणरायांच्या आरत्यांबरोबर भजनांची तल्लीनता वाढेल. अनंत चतुर्दशीपर्यंत भाविक आपापल्या परीने बाप्पाची मनोभावे सेवा करतील. काहींच्या घरी दीड तर काहींच्या घरी तो 21 दिवस विराजमान असेल. बहुतांश ठिकाणी गणराय पाच दिवस वास्तव्यास असतील. काही दिवस घुमटाच्या सुमधूर आवाजाने वातावरण भक्तिमय बनेल.

आतषबाजी आणि सजावट

चतुर्थीमध्ये फटाके फोडण्याची वेगळीच परंपरा असून यासाठी बाजारात फटाके, फुलबाज्या, सुतळी बॉम्ब, आऊट यासारख्या गोष्टी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. सजावटीसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अनेक आकर्षक वस्तूंची खरेदी केली. गणपतीची ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाते त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण रहावे म्हणून सजावटीचे साहित्य अनेक भक्तांनी खरेदी केले होते. यात कागदी फुले, कागदी मखर, विविध प्रकारची खेळणी, लाकडी चौरंग, विविध प्रकारच्या रंगबेरंगी रांगोळीचा समावेश होता.

Goa Ganesh Festival
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल-डिझेल महाग? जाणून घ्या आजचे दर

मिठाईची दुकाने सजली

बाप्पाच्या आगमनानिमित्त घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल असते. यात नेवऱ्या (करंज्या), मोदक, शेव, गोडीशेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे आदी पदार्थांचा समावेश आहे. दुसरीकडे यासाठी मिठाई दुकानेही सजली असली असून विविध पदार्थांपासून बनविलेले मोदक, बाप्पाचे आवडते लाडू, काजू लाडू, बुंदी लाडू, खोबरे आणि ड्रायफ्रुट लाडू इत्यादी पदार्थ नागरिक एकमेकांना भेटस्वरुपात देत आहेत. श्री गणेश चतुर्थीनिमित्त अनेक पदार्थ महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण माटोळी : गोमंतकीय चतुर्थीचे खास वैशिष्ट्ये असते ती माटोळी. ‘श्रीं’च्या मूर्तीवर ही पारंपारिक माटोळी बांधण्याची परंपरा आहे. आपल्या भोवताली मिळणारी फळे, फुले, भाज्या, वेली, कंदमुळे इत्यादी नैसर्गिक घटकांनी बनवलेल्या माटोळी हे प्रमुख आकर्षण असते. यंदाही या माटोळी साहित्यांसाठी भरलेल्या बाजारांमधून साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com