Goa Ganesh Chaturthi: डिचोलीत ‘चवथीचो बाजार’ तर बाणस्तारीत 'माटोळीचो बाजारा'ला उत्साह

बाजारात थाटले आहेत तब्‍बल 60 स्टॉल्‍स
Goa Ganesh Chaturthi
Goa Ganesh ChaturthiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganesh Chaturthi महिला स्वयंसाहाय्‍य गटांना बाजारपेठ मिळवून देतानाच, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार आग्रही आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. येथे तीन दिवसीय ‘चवथीचो बाजार’ या विक्री प्रदर्शनाचे काल उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, ‘आरडीए’चे संचालक भूषण सावईकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश कारापूरकर उपस्थित होते.

सरकारच्या ई-बाजार तसेच विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले. कुंदन फळारी यांचेही भाषण झाले.

सुरूवातीला फेरीलँड शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतनृत्य सादर केले. दिलीप धारगळकर यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड. शुभा दीक्षित यांनी आभार मानले.

Goa Ganesh Chaturthi
Goa Accident: बांदोडा-फोंडा उड्डाण पुलावर क्रेन-ट्रकचा अपघात; केबिनमध्येच चालक अडकला...

बाजारात थाटले आहेत तब्‍बल 60 स्टॉल्‍स

ग्रामीण विकास यंत्रणा आणि डिचोली लायन्स क्लबच्या सहकार्याने शिक्षा व्हिजन डिचोलीतर्फे हिराबाई झांट्ये सभागृहात हा बाजार भरविण्यात आला आहे. या बाजारात डिचोली आणि मये मतदारसंघातील मिळून महिला गटांनी एकूण 60 स्टॉल्‍स थाटले आहेत.

बाजारात खाद्यपदार्थांसह कपडे तसेच चतुर्थीला लागणाऱ्या नानाविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. उद्‌घाटन सोहळ्यानंतर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विविध लोककला पथकांकडून लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्‍यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बाणस्तारीत फुलला माटोळीचा बाजार

बाणस्तारीत गुरुवार, शुक्रवारी साप्ताहिक बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. त्यानंतर आज शनिवार 16 सप्‍टेंबर रोजी नव्या मार्केट प्रकल्पात प्रसिद्ध माटोळी बाजार भरणार होता. त्याबाबत सरपंच दामोदर नाईक यांनी सूचनाही केली होती.

परंतु व्यापाऱ्यांनी दोन्हीकडे बाजार नको, यंदा हनुमान मंदिराजवळ आम्ही बसतो, असे सांगितले. त्यामुळे यंदा नव्या मार्केट प्रकल्पाचे उद्‍घाटन होऊनही जुन्याच जागेत बाजार भरला. उद्या रविवार दि. 17 रोजीही हा बाजार सुरू राहणार आहे.

बाजारात श्री गणेशाला प्रिय असलेल्या निसर्गातील माटोळीच्या वस्तू म्हणून विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. सुपारीचे, केळ्यांचे घड, नारळाच्या पेणी, नारिंग, तोरीण, भोपळा, टरबूज वेगवेगळी जंगली फळे, चिकू, फणस, वेगवेगळ्या प्रकारची भाज्‍याही बाजारात उपलब्ध आहेत.

बाजारात जागा अपुरी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूलाही बाजार भरला आहे. चतुर्थी आणि बाणस्तारीतील माटोळीचा बाजार हे जणू समीकरणच बनले आहे. पोर्तुगीज काळापासून हा बाजार प्रसिद्ध आहे. बहुतांश गोमंतकीय या बाजाराला भेट देतात. दोन दिवसांत तेथे लाखो रुपयांची उलाढाल होते.

Goa Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi: करंज्‍या, माेदक बनविण्‍याची तयारी अंतिम टप्‍प्‍यात; खरेदीसुद्धा जोमात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com