Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Ganesh Festival: ‘गणपती बाप्‍पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष आणि आरत्यांच्या निनादासह राज्‍यातील गावागावांत चतुर्थीचा उत्साह पसरला आहे. त्‍यामुळे सर्वत्र मंगल आणि भक्तिमय वातावरण आहे.
Goa Ganesh Chaturthi festival
Goa Ganesh Chaturthi festivalDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘गणपती बाप्‍पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष आणि आरत्यांच्या निनादासह राज्‍यातील गावागावांत चतुर्थीचा उत्साह पसरला आहे. त्‍यामुळे सर्वत्र मंगल आणि भक्तिमय वातावरण आहे.

यंदा चतुर्थी सणावर पावसाचे सावट असले आणि गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कहर केला असताना देखील भक्तांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. बालगोपाळांसह समस्त गणेशभक्त आपले आराध्‍य दैवत गणरायाच्या सेवेत मग्न झाले असून, बच्चे मंडळी तर भलतीच खूष आहे. लाडक्या श्री गणपती घरी आगमन झाल्याने बालगोपाळांचा उत्‍साह ओसंडून वाहत आहे.

बहुतांश भागात गणेशभक्तांनी गणपतीसमोर आकर्षक अशी इको-फ्रेंडली सजावट आणि देखावे उभारले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील गणपतीसमोर आकर्षक सजावट केली आहे. तर, विविध गणेशोत्सव मंडळांनी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Goa Ganesh Chaturthi festival
Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

बहुतांश घरांत ५ दिवसांचा उत्‍सव

डिचोली तालुक्यातील बहुतांश भागात परंपरेप्रमाणे पाच दिवस, तर मोजक्याच गावात दीड आणि सात दिवस चतुर्थी उत्‍सव साजरी करण्यात येतो. ठरावीक गाव वगळता

सर्वण, मये, मुळगाव, मये, साळ, मेणकुरे आदी भागात यंदाही पाच दिवसांची ‘चवथ’ साजरी करण्यात येणार आहे.

Goa Ganesh Chaturthi festival
Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल!

डिचोली आणि परिसरातील गावागावांत सर्वत्र घरोघरी चतुर्थीचा उत्साह दिसून येत आहे. बहुतांश घरांमध्‍ये मंगळवारी सायंकाळीच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. बुधवारी सकाळी गणपतीचे पूजन करण्‍यात आले. त्‍यानंतर घरोघरी घुमट आरत्यांचा निनाद घुमू लागला आहे. महिलावर्ग फुगड्यांचा ताल धरत आहेत. भजनाचे स्वरही कानी पडत आहेत. आता पुढील अकरा दिवस सर्वत्र चतुर्थीचा उत्साह कायम राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com