मैदानावर काळाचा घाला! 'रुईशा'चा हॉकीचा सराव ठरला अखेरचा, डोक्याला चेंडू लागून 14 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Ruisha Sudhir Kharsel Death: मोंते दी गिरी येथील सेंट अँथनी माध्यमिक शाळेच्या मैदानावर हॉकी सरावाच्या अखेरच्या दिवशी एका १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या डोक्याला चेंडू लागून तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
Ruisha Sudhir Kharsel Death
Ruisha Sudhir Kharsel DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: मोंते दी गिरी येथील सेंट अँथनी माध्यमिक शाळेच्या मैदानावर हॉकी सरावाच्या अखेरच्या दिवशी एका १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या डोक्याला चेंडू लागून तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आणि खेळाच्या मैदानावरील आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल बनले. रुईशा सुधीर खर्सेल (वय १४, रा. साळगाव-सांगोल्डा) असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुईशा मैत्रिणींसोबत शाळेच्या मैदानावर हॉकीचा सराव करत होती. सरावादरम्यान अचानक चेंडू वेगाने तिच्या डोक्याच्या मागील बाजूस वर्मी लागला. या जोरदार प्रहारामुळे ती जागीच कोसळली. तिला तातडीने उपचारासाठी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साळगाव पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. रुईशा ही उत्तम हॉकीपटू होती.

Ruisha Sudhir Kharsel Death
Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

रुईशा ही उत्साही आणि गुणी खेळाडू म्हणून ओळखली जात होती. तिच्या अकाली निधनामुळे सांगोल्डा परिसर आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उभरत्या खेळाडूचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे क्रीडा सरावादरम्यान खेळाडूंची सुरक्षितता आणि आवश्यक संरक्षक साधनांच्या वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
Sporting Club Goa Charity Cup
Aarush Pawaskar World Junior Ranking
Yashasvi Jaiswal Asitha Fernando clash
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com