Sanguem: मेशू-पोलिसांत वाक्‌युद्ध, वकिलांना ढकलल्याने ठाण्यात तणावपूर्ण वातावरण

Meshu D’Costa Sanguem Police: गोवा फॉरवर्ड पक्षाचे युवा नेते मेशू डिकॉस्ता, दत्तराज गावस देसाई आणि सांगे पोलिसांत जोरदार शाब्दिक चकमक झाली.
Sanguem
SanguemDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे : गोवा फॉरवर्ड पक्षाचे युवा नेते मेशू डिकॉस्ता, दत्तराज गावस देसाई आणि सांगे पोलिसांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी उपनिरीक्षक कृष्णदास बोरकर यांनी मेशू यांचे वकील विराज नागेकर यांना ढकलल्याने सांगे पोलिस ठाण्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

दोन दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाचे गोवा राज्य युवा अध्यक्ष मेशू डिकॉस्ता यांनी सांगे येथील बांधकाम खात्याच्या कार्यालयात जाऊन नोंदूर्ले येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते आणि कर्मचाऱ्यांनी उत्तर न दिल्याने अधिकाऱ्यांना कॉल केला असता ठोस उत्तर न दिल्याने त्यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद केला.

याप्रकरणी ‘साबांखा’चे साहाय्यक अभियंता तौफिल यांनी, कार्यालयात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी सांगे पोलिस ठाण्यात मेशूविरोधात तक्रार नोंद केली होती.

Sanguem
FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

ज्यांनी मेशूविरोधात तक्रार दिली, त्यापैकी कोणीही हजर न राहता मेशूविरोधात तक्रार रजिस्टर केल्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला. या गडबडीत उपनिरीक्षक कृष्णदास बोरकर यांनी मेशूचे वकील म्हणून हजर राहिलेल्या विराज नागेकर यांना ढकलल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यासंदर्भात मेशू यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खड्डे बुजविले. याचा अर्थ माझी मागणी रास्त होती.

समाजाच्या कामासाठी माझ्यावर कितीही खटले घातले, तरी मी मागे हटणार नाही. जनतेचा आवाज बनून चुकीच्या प्रत्येक गोष्टीवर बोलत राहणार असल्याचे मेशू यांनी स्पष्ट केले.

Sanguem
Goa vs Oman T20: गोव्याकडून ओमानला विजयाची 'भेट'; मोहित रेडकर, दीपराज गावकरचा बोथट मारा; क्षेत्ररक्षणही गचाळ

सरकारी कार्यालयात प्रवेश बेकायदा कसा?

मेशू यांनी जबानीत स्पष्टपणे उल्लेख केला आहे, की नोंदूर्ले पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा खड्ड्यात पडून गर्भपात झाल्यामुळे मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तक्रार नोंद करण्यासाठी गेलो असता, मी बेकायदेशीर प्रवेश केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. सार्वजनिक आणि सरकारी कार्यालयात प्रवेश करणे हा कधीपासून बेकायदेशीरपणा ठरतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com