Sunday Dialogues: सरदेसाईंच्‍या ‘संडे डायलॉग्‍स’चे केंद्रीय काँग्रेसी नेत्‍यांकडून कौतुक

Goa Forward Vijai Sardesai: दिल्‍लीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय सरदेसाई यांचे कौतुक करून ‘इंडिया’ साठी असे उपक्रम फायद्याचेच ठरतील अशा प्रतिक्रिया दिल्या
Goa Forward Vijai Sardesai: दिल्‍लीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय सरदेसाई यांचे कौतुक करून ‘इंडिया’ साठी असे उपक्रम फायद्याचेच ठरतील अशा प्रतिक्रिया दिल्या
Marago Vijai Sardesai Janata Darbar Sunday DialogueDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी काल रविवारी कुडचडे येथे ‘संडे डायलॉग्‍स’ आयोजित करून कुडचडेवासीयांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या. मात्र, त्‍याला गोवा काँग्रेसच्या एका गटाने आक्षेप घेतल्‍याने या कार्यक्रमाला राजकीय वळण लागले होेते.

मात्र, तरी दिल्‍लीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय सरदेसाई यांचे कौतुक करून ‘इंडिया’ साठी असे उपक्रम फायद्याचेच ठरतील, अशा प्रतिक्रिया दिल्याने दिल्‍लीतील काँग्रेस आणि गोव्‍यातील काँग्रेस यांच्‍यात समन्‍वय नाही का, असा प्रश्‍न लाेकांना पडला आहे. दरम्यान, खेमलो सावंत यांनीही स्तुती केली आहे.

Goa Forward Vijai Sardesai: दिल्‍लीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय सरदेसाई यांचे कौतुक करून ‘इंडिया’ साठी असे उपक्रम फायद्याचेच ठरतील अशा प्रतिक्रिया दिल्या
Goa Janata Darbar: दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग; मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

एआयसीसीचे मीडिया पॅनेलिस्‍ट असलेले अंशुमन नेहरु यांनी सरदेसाई यांच्‍या या उपक्रमाचे काैतुक करताना अशा कार्यक्रमामुळे ‘इंडिया’ ला फायदा होईल, असे मत व्‍यक्‍त करून ‘इंडिया’२०२७ मध्‍ये गोव्‍यात सरकार स्‍थापेल, असे ट्‍वीट केले आहे. राष्‍ट्रीय प्रवक्‍त्‍या डॉ. शमा महमद यांनी या ट्‍वीटला पसंती दर्शवली आहे.

सरदेसाई यांनी कुडचडेत कार्यक्रम घेताना प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांना कल्‍पना दिली नव्‍हती. त्‍यामुळे या कार्यक्रमामागे राजकारण असावे, असा आक्षेप मॉरेनो रिबेलो यांनी घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com