Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

Opposition mega alliance Goa: ‘‘भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि महाआघाडी करावी, अशी मागणी गोमंतकीय जनतेची असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंनी सांगितले.
Opposition mega alliance Goa
vijai sardesaiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि महाआघाडी करावी, अशी मागणी गोमंतकीय जनतेची असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंनी सांगितले.

ते म्हणाले, जनतेला हवे असलेले जे पक्ष मान्य करीत नाहीत, अशा पक्षांना जनता स्वीकारत नाही. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीबाबत तत्काळ चर्चा करून दसऱ्यापर्यंत सोक्षमोक्ष लावणे आवश्यक आहे.

आम आदमी पक्षासोबत (आप) केलेली युती काहीच दिवसांत तोडल्यानंतर आमदार सरदेसाई पुढे काय भूमिका घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. ‘‘पितृपक्ष संपल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू,’’ असे त्यांनी सांगितले होते. परंतु, आता मात्र, ‘‘भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वच विरोधी पक्षांनी संघटित व्हावे, असे जनतेला वाटत आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जनतेचे म्हणणे ऐकणे, निवडणूक जवळ येत असल्याने वेळ न दवडता दसऱ्यापर्यंत महाआघाडीसंदर्भात चर्चा करून ठाम निर्णय घेणे आणि पुढील रणनीती निश्चित करणे आवश्यक आहे. जनतेच्या मतानुसार विरोधी पक्ष संघटित झाल्यास जनता राज्यात राजकीय बदल घडवून आपले स्वप्न पूर्ण करेल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Opposition mega alliance Goa
Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतचोरीविरोधात काँग्रेस, कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडत आहे. मतचोरीला जबाबदार असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत गोव्यातही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊन त्यात उतरणे गरजेचे आहे,’’ असेही सरदेसाई यांनी नमूद केले. ज्या पद्धतीने भाजप सरकार आंदोलकांवर अन्याय करीत आहेत ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

Opposition mega alliance Goa
गोव्यात 'हॉलिवूड' स्टाईल अपघात! बांबोळीत कार हवेत उडून दुसऱ्या वाहनावर विसावली, काही काळ वाहतूक कोंडी

‘आप’चे चुकलेच!

‘येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष या नात्याने ‘आप’ने सत्ताधारी भाजपवर टीका करणे गरजेचे आहे. परंतु, भाजपला सोडून ‘आप’चे नेते काँग्रेसवरच निशाणे सोडत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे आमदार सरदेसाई म्हणाले. विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या अनुषंगानेच आपण ‘आप’शी युती करून ‘गोवा फर्स्ट’ हा मंच तयार केला होता. ही युती तोडून आपण कोणतीही चूक केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

जागावाटपाबाबत लवकरच चर्चा : वीरेश

जागावाटपाबाबत काँग्रेस आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षात (आरजी) पुढील काहीच दिवसांत चर्चा सुरू होणार आहे. काँग्रेसच्या ‘गोवा राखण यात्रे’मुळे गेल्या काही दिवसांत त्यात खंड पडला. परंतु, दोन्ही पक्ष एकमेकांच्या संपर्कात असून, ही चर्चा लवकरच होईल, असे आमदार तथा आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना स्पष्ट केले.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com