Vijai Sardesai On Western Bypass Benaulim On Stilts: वेस्टर्न बायपासचा बाणावलीदरम्यानचा काही रस्ता मातीचा भराव टाकून न बांधता तो स्टील्टवर बांधावा यासाठी आपण केलेली मागणी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली होती.
मात्र, आता हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामागे गोवा सरकारमध्ये असलेल्यांचेच कारस्थान असावे, अशी शंका आपल्याला येते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
सरदेसाई यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली होती. बाणावली भागातील रस्ता मातीचा भराव टाकून तयार केल्यास पावसात या भागात पूर येईल, असे सांगून या भागातील रस्ता स्टील्टवर बनवावा, अशी मागणी केली होती.
त्यानंतर गडकरी यांनी केंद्रातून एका तज्ज्ञाला गोव्यात पाहणी करण्यासाठी पाठविले होते. ही पाहणी करून तज्ज्ञ दिल्लीला गेल्यानंतर आता हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे सांगितले जाते.
हा रस्ता स्टील्टवर बांधण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र, सरकारकडे नको असलेल्या इव्हेंटवर खर्च करण्यासाठी मुबलक पैसे आहेत.
पण सासष्टीच्या लोकांसाठी जी कायमस्वरूपी समस्या बनू शकते, त्यावर खर्च करण्यास पैसा नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.
विजय सरदेसाई म्हणाले,
पावसात या भागात पाणी अडून पूर येऊ शकतो, ही शक्यता केंद्रीय तज्ज्ञांनी मान्य केली आहे. याचाच अर्थ मी जी पूर्वी भीती व्यक्त केली होती, ती योग्य होती यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यावेळी गडकरी यांनी अशी अडचण येत असल्यास हा रस्ता स्टील्टवर बांधू असे आपल्याला आश्वासन दिले होते.
मात्र, त्यानंतर गोवा विधानसभेत या प्रस्तावावर चर्चा झाली. हा रस्ता स्टील्टवर उभारल्यास त्याचे श्रेय मला मिळणार या एकमेव कारणावरून गोवा सरकारातील काही महाभागांनी केंद्राची दिशाभूल करून हा प्रस्ताव नाकारण्यास भाग पाडले असावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.