Goa Politics: सावंत - राणे यांच्यात अखेर दिलजमाई; दिव्या राणेंची भूमिका महत्त्वाची

Goa Politics: सत्तरीतील कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसाठी ढकलला होता आठ दिवस पुढे
Goa Cm Pramod Sawant And Health Min Vishwajit Rane
Goa Cm Pramod Sawant And Health Min Vishwajit RaneDainik Gomantak

Goa Politics News: मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिलजमाई झाल्याचे चित्र सध्या दिसत असले, तरी त्यामागे पडद्यामागील सूत्रधार आमदार डॉ. दिव्या राणे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री अनुपलब्ध असल्यानेच काल मोर्ले कॉलनी येथे झालेला कार्यक्रम 2 सप्टेंबर ऐवजी 10 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. सत्तरीतील विकासकामे त्याच मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करवून घेत आहेत.

आरोग्यमंत्री राणे यांच्या उपस्थितीत यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात आपणात व राणे यांच्यात मतभेद नाहीत, विरोधक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असे दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधान केले होते.

त्यानंतर सातत्याने राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Goa Cm Pramod Sawant And Health Min Vishwajit Rane
Goa University: 'राजकीय व्यक्तींकडून माझ्याविरोधात षडयंत्र', प्राध्यापक धमकी प्रकरणात विद्यार्थ्याचा खुलासा

‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्याचे प्रक्षेपण पाहिल्यानंतर एकमेकांचे तोंड गोड करत या दोन्ही नेत्यांनी सारे काही आलबेल असल्याचा संदेश जाहीरपणे देण्याचा प्रयत्न केला होता.

आजही उज्जैन येथील महाकाल मंदिरात झालेल्या भस्म आरतीवेळी राणे दांपत्य मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

नेते, कार्यकर्त्यांच्या पाठबळासाठी राणेंची खटाटोप

सत्तरीत राणे यांचे नेतृत्व मानणारे सध्या भाजपमध्ये आहेत. त्याशिवाय वाळपईतून नरहरी हळदणकर आमदार म्हणून १९९४ मध्ये निवडून येण्याआधीपासून पक्षाचे काम करणारे अनेक नेते, कार्यकर्ते आहेत.

ते सध्या आपले प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. वाळपई येथे व्याघ्र प्रकल्पविरोधी सभेचे आयोजन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच केले होते.

त्यामुळे ते नेते, कार्यकर्ते आपल्याकडे वळावेत यासाठी राणे हे सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याचे पालुपद आळवत असल्याची माहिती मिळाली आहे.

Goa Cm Pramod Sawant And Health Min Vishwajit Rane
Goa University: अखेर ‘त्या’ विद्यार्थ्याचे नमते; प्राध्यापक एकवटले

कामतांच्या प्रवेशामुळे सौहार्दाचे संबंध

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांपैकी दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले, तर राणे यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांपैकी नगरनियोजन खाते कामत यांना द्यावे लागण्याची शक्यता आहे.

कामत यांचा प्रवेश आपल्याला त्रासदायक ठरू नये यासाठी राणे हे मुख्यमंत्र्यांशी सौहार्दाचे संबंध असल्याचे उघडपणे दाखवत असल्याची राजकीय चर्चा आहे.

पर्येतील कार्यक्रमाकडे साऱ्यांचे लक्ष

पर्ये येथे १६ रोजी एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० हजार जणांच्या बैठक व्यवस्थेचा मंडप तेथे घालण्यात येणार आहे.

पर्येच्या कार्यक्रमास ते मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com