राज्यभर चर्चेत आलेली मांद्रे पंचायत सरपंच निवड बिनविरोध

मांद्रे सरपंचावर पहिल्या दिवशीच अविश्वास ठरावासारख्या नामूष्कीला सामोरे जावे लागले होते
mandrem news
mandrem news Dainik Gomantak

गोवा राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यावर पहिल्याच दिवशी पेडणे तालूक्यातील मांद्रे ग्रामपंचायत राज्यभर चर्चेत आली होती. या ग्रामपंचायतीत सरपंच निवडीच्या पहिल्या दिवशीच सरपंचावर अविश्वास दाखल करण्यात आला होता. यामूळे नवनियूक्त सरपंचांना पदावरुन दुर व्हावे लागले होते. आज या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमित सावंत यांची निवड झाली आहे.

(Adv. Amit Sawant elected unopposed as Mandrem Gram Panchayat Sarpanch)

mandrem news
Anjuna Crime: हणजूण कार्लिस शॅक परिसरात आढळला मानवी मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार आज मांद्रे पंचायत सरपंच निवड पार पडली असून विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध पार पडली आहे. तसेच आता सरपंच पदाची माळ अमित सावंत यांच्या गळ्यात पडली आहे. इतकी रस्सीखेच होऊन आता ही निवड बिनविरोध झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवनियूक्त सरपंच वकील अमित सावंत हे पेशाने वकिल असून यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामूळे महेश कोनाडकर यांच्या वर 24 तासात अविश्वास ठराव आणला होता. तो मंजूर झाल्यानंतर आता आमदार जित आरोलकर यांनी माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून ग्रामपंचायत हिसकावून ताब्यात घेतली असल्याची चर्चा आहे.

mandrem news
Goa Wildlife Sanctuaries : गोव्यातील ही अभयारण्ये म्हणजे पक्षी-प्राणी प्रेमींसाठी पर्वणीच!

काय झालं होतं नेमकं प्रकरण ?

गोवा राज्यात 23 ऑगस्ट रोजी पेडणे तालूक्यातील मांद्रे ग्रामपंचायतीतील सरपंचाची निवड होऊन एक दिवस झाला नसताना नवनिर्वाचित सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाला मांडण्यात आला. यावेळी मांद्रे पंचायत संरपंच पदासाठी आमदार जित आरोलकर तसेच आमदार दयानंद सोपटे यांनी आपलं वर्चस्व राहावं यासाठी हे डावपेच रचले जात असल्याची सर्वत्र चर्चा होती.

अविश्वास प्रस्तावावर 29 ऑगस्ट रोजी पुन्हा पंचांना आजमावत मतांचा कल घेण्यात आला या निवडणूकीत तत्कालीन संरपंच महेश कोनाडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. इतकी रस्सीखेच झाली असताना आता मात्र अचानक सरपंच पदी अमित सावंत यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र चर्चेला पुन्हा उधान आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com