नोकर भरतीप्रश्‍‍नी सरकारचा बुरखा फाटला

हा तर अन्‍यायग्रस्‍त युवकांचा विजय; गोवा फॉरवर्डकडून सरकारवर निशाणा
government job scam | Durgadas Kamat
government job scam | Durgadas Kamat Dainik Gomantak 

पणजी : सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्‍यात केलेल्या नोकरभरतीत घोटाळा झाल्‍याचे गोवा फॉरवर्डने गेल्‍या डिसेंबरमध्ये उघडकीस आणले होते. ॲडव्‍होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज मंगळवारी उच्च न्‍यायालयात ही भरती रद्द केल्‍याचे सांगितले. यावरून आमचे आरोप खरे होते हे सिद्ध झालेय, असे गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी पक्षाच्‍या येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.

साबांखामध्ये नोकरीसाठी पैसे मागितले जात असल्‍याच्‍या अनेक तक्रारी आमच्‍याकडे आल्‍या होत्‍या. यात तरुणींचा अधिक समावेश होता. सरकारने पैसे घेऊन धनदांडग्‍यांना नोकरी देण्याचा धंदा सुरू केला होता. जे उमेद‌वार पात्र असूनही पैसे देऊ शकत नाहीत, अशांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्‍या. त्‍यामुळे अनेकांवर अन्‍याय झाला. त्‍यास गोवा फॉरवर्डने वाचा फोडली, असे कामत म्‍हणाले.

अन्‍याय झालेल्‍या उमेद‌वारांपैकी एकाने उच्च न्‍यायालयात धाव घेतली होती. त्‍यावर आज झालेल्‍या सुनावणीत ॲडव्‍होकेट जनरल पांगम यांनी साबांखामधील नोकरभरतीच रद्द केल्‍याचे न्‍यायालयाला सांगितले. गोवा फॉरवडने हा प्रश्‍न धसास लावला व युवकांना न्‍याय मिळाला, सत्‍याचा विजय झाला असे कामत म्‍हणाले.

government job scam | Durgadas Kamat
वेश्या व्यवसायातील महिलांनी मडगाव पोलीस स्थानकात घातला धिंगाणा

पंचायत निवडणूक : सरकारला दुसरा दणका

ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांबाबत उच्च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयाविषयी विचारले असता कामत म्‍हणाले, राज्‍य सरकारला आज बसलेला हा दुसरा दणका आहे. काहीबाही कारणे सांगून ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलणाऱ्या राज्‍य सरकारला ही सणसणीत चपराक आहे. आता ही निवडणूक सरकारला घ्यावीच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com