वेश्या व्यवसायातील महिलांनी मडगाव पोलीस स्थानकात घातला धिंगाणा

मडगाव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिला तसेच तृतीयपंथीयांनी आज रात्री मडगाव पोलीस स्थानकावर येऊन अक्षरशः धिंगाणा घातला.
Women
WomenDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव (Margao) शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिला तसेच तृतीयपंथीयांनी आज रात्री मडगाव पोलीस स्थानकावर येऊन अक्षरशः धिंगाणा घातला. पोलीस आमच्याकडून हप्ते घेतात, आमच्या गिर्हाईकांचे पैसे जबरदस्तीने काढून घेऊन जातात. आम्ही काही विचारायला गेलो तर आम्हाला मारहाण करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. (Women in prostitution rioted at Margao police station)

दरम्यान, रात्री 9 च्या सुमारास सुमारे 10-12 जणांच्या गटाने पोलीस (Police) स्थानकात शिरुन हा गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यापैकी एका महिलेने पोलीस स्थानकात उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला बोट दाखवत याच्याकडून आमची सतावणूक होते असा थेट आरोप केला. एका महिलेने (Women) प्रसार माध्यमांशी बोलताना, मडगाव पोलीस स्थानकावरील तीन ते चार पोलीस येऊन आम्हाला रोज सतावतात. काही जण आमच्याकडे शरीरसुखाची मागणी करतात असा आरोपही त्यांनी केला.

Women
मडगाव रवींद्र भवनच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या : कलाकारांची मागणी

दुसरीकडे, सुमारे अर्धा तास हा धिंगाणा चालू होता. पोलीस हतबल होऊन त्यांच्याकडे पाहत होते. आम्ही अडचणीत असल्यामुळे अशा व्यवसायात आहोत आम्हाला आणखी छळू नका, अशी मागणी या महिलांना केली. आम्ही ओल्ड स्टेशन रोडवर व्यवसाय करतो. तिथे जे चोर होते त्यांना आम्ही हाकलून लावले त्यामुळे त्या चोराकडून मिळणारे पैसे आता पोलिसांना मिळत नाहीत म्हणून आता ते आम्हाला सतावू लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com