Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Goa University Recruitment: गोवा विद्यापीठाने २१ डिसेंबर २०२३ रोजी पृथ्वी, सागर व वातावरण विज्ञान विभागासाठी साहाय्यक प्रोफेसर भरतीसाठी चार पदे जाहीर केली होती.
 Goa University Recruitment: गोवा विद्यापीठाने २१ डिसेंबर २०२३ रोजी पृथ्वी, सागर व वातावरण विज्ञान विभागासाठी साहाय्यक प्रोफेसर भरतीसाठी चार पदे जाहीर केली होती.
Recritment Canva
Published on
Updated on

सासष्टी: गोवा विद्यापीठातील नोकरभरतीसाठी सात दिवसांच्या आत नवीन अधिसुचना रद्द करून जुनी अधिसुचना सुचित करावी, अशी मागणी आज गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गोवा विद्यापीठाने २१ डिसेंबर २०२३ रोजी पृथ्वी, सागर व वातावरण विज्ञान विभागासाठी साहाय्यक प्रोफेसर भरतीसाठी चार पदे जाहीर केली होती. त्यातील प्रत्येकी एक ओबीसी व एसटीसाठी होते. त्यासाठी उमेदवाराला कोकणी व मराठीचे ज्ञान व गोव्यात १५ वर्षांचे वास्तव्य असणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.

या पदांसाठी गोव्यातून अनेक पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते. मुलाखती झाल्या, नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, गोव्याबाहेरील उमेदवाराला घेता येत नाही म्हणून भरतीसाठी जाहीर केलेली अधिसूचनाच रद्द करण्यात आली व २ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन अधिसुचना काढण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

 Goa University Recruitment: गोवा विद्यापीठाने २१ डिसेंबर २०२३ रोजी पृथ्वी, सागर व वातावरण विज्ञान विभागासाठी साहाय्यक प्रोफेसर भरतीसाठी चार पदे जाहीर केली होती.
गोव्यातील युवक हताश! एकीकडे दुप्पट Unemployment Rate तर दुसरीकडे पैसे घेऊनच नोकरी; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

जी नवीन अधिसुचना जाहीर करण्यात आली ती केवळ दोन पदांसाठी होती व ओबीसी, एसटीसाठी राखीव असलेली पदे रद्द करण्यात आली. त्याचबरोबर कोकणी, मराठी भाषेची सक्ती व गोव्यात १५ वर्षांचे वास्तव्य या अटीसुद्धा रद्द करण्यात आल्या. आता केवळ दोन पदांसाठी १८ ऑक्टोबर रोजी मुलाखती होणार आहेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com