'जिल्‍हाधिकारी'तील बेकायदेशीर नोकरभरती प्रक्रिया रद्द करा; 'Goa Forward'चे जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन

Goa News: दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात लिपीक आणि अन्‍य पदे भरण्‍यासाठी जी निवड प्रक्रिया हाती घेतली होती, ती पूर्णत: बेकायदेशीर असून ही प्रक्रिया त्‍वरित रद्द करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डने केली.
Goa Forward, South Goa district collector
Goa Forward Dainik Gomanatak
Published on
Updated on

Goa Forward Demands Cancellation of District Collector Office Recruitment

मडगाव: दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात लिपीक आणि अन्‍य पदे भरण्‍यासाठी जी निवड प्रक्रिया हाती घेतली होती, ती पूर्णत: बेकायदेशीर असून ही प्रक्रिया त्‍वरित रद्द करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डने केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज गोवा फॉरवर्डच्‍या एका शिष्‍टमंडळाने दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी एग्‍ना क्‍लिटस यांची भेट घेऊन त्‍यांना हे निवेदन दिले.

ही भरती प्रक्रिया २०१९ साली सुरू केली होती त्‍यासाठी जी अधिसूचना जारी केली होती, त्‍याची कायदेशीर वैधता कधीच संपली आहे. त्‍यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून ती त्‍वरित रद्द करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्‍टमंडळात गोवा फॉरवर्डचे उपाध्‍यक्ष दिलीप प्रभुदेसाई, सरचिटणीस मोहनदास लाेलयेकर, पूजा नाईक व अन्‍य सदस्‍यांचा समावेश हाेता.

Goa Forward, South Goa district collector
Cash For Job Scam: नोकरी घाेटाळ्‍याची दोरी 'वेगळ्यांच्याच' हातात! सीबीआय चौकशीची खासदार विरियातोंची मागणी

नोकरभरती प्रक्रियेस चार वर्षे का लागली?

मोहनदास लोलयेकर म्हणाले, की २०१९ साली नोकरभरती प्रक्रिया सुरू केली होती ती पूर्ण हाेण्‍यास चार वर्षांचा कालावधी का लागला. २०१९ साली जिल्‍हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची गरज भासली होती, तर ही प्रक्रिया २०२० पर्यंत का पूर्ण झाली नाही असा सवाल करून सरकारातील काही मंत्री स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी या नोकऱ्यांचा वापर करतात. घाेटाळ्‍यात आपला हात नाही हे सिद्ध करण्‍याची जबाबदारी सर्व मंत्र्यांवर पडलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com